Hot Posts

6/recent/ticker-posts

गणपती फार्मसीमध्ये "पोस्ट- जिपॅट संधी" या विषयावर व्याख्यान संपन्न

 गणपती फार्मसीमध्ये "पोस्ट- जिपॅट संधी" या विषयावर व्याख्यान संपन्न




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-
 गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, टेंभूर्णी येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला चालना देण्यासाठी स्पर्धा परीक्षा सेलच्या वतीने "पोस्ट- जिपॅट संधी या विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाचे मार्गदर्शन फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी, सांगोला येथील सहाय्यक प्राध्यापक प्रा. कांचन दशरथ यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली. प्राचार्या डॉ. आर. आर. बेंदगुडे यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना जिपॅट परीक्षेच्या महत्त्वाबद्दल माहिती दिली आणि प्रा. कांचन दशरथ यांची सविस्तर ओळख करून दिली.
प्रा. कांचन दशरथ यांनी विद्यार्थ्यांना जिपॅट परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप, आणि तयारीसाठी आवश्यक तांत्रिक कौशल्ये याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी अभ्यासाच्या वेगवेगळ्या तंत्रांचा उलगडा करताना वेळेचे नियोजन, स्मार्ट स्टडी टेक्निक, आणि विश्वासार्ह स्रोतांचा वापर कसा करायचा याबद्दल सखोल माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वाचे विषय, मागील वर्षांचे प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, आणि परीक्षेसाठी उपलब्ध असलेल्या संसाधनांचा योग्य प्रकारे कसा उपयोग करायचा हेही समजावले.
त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सांगितले की, "स्पर्धा परीक्षा ही केवळ कठोर परिश्रमांवरच नाही तर योग्य दिशा आणि अभ्यासाच्या प्रभावी पद्धतींवरही अवलंबून असते." व्याख्यानादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले आणि तयारीसाठी काही उपयुक्त सल्ले दिले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे, अध्यक्ष अ‍ॅड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्राचार्या डॉ. आर. आर. बेंदगुडे, डॉ. प्रशांत मिसाळ,  नामदेव शिंदे,  शिवराज ढगे, प्रा. अक्षय भेंकी उपस्थित होते. 
विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाला सकारात्मक प्रतिसाद दिला. हे व्याख्यान विद्यार्थ्यांना जिपॅट परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शक ठरले असून सदर कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून  कोमल साळुंखे यांनी काम केले.


Reactions

Post a Comment

0 Comments