Hot Posts

6/recent/ticker-posts

तिवडी यांचे अन्नपूर्णा मिठाई दिवाळी दुबई टूर चा लकी ड्रॉ

 तिवडी यांचे अन्नपूर्णा मिठाई दिवाळी दुबई टूर चा लकी ड्रॉ





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- 50 हजार रू.मिठाई खरेदीवर देण्यात येणाऱ्या कूपन मधून लकी ड्रॉ काढली जाईल व विजेत्याला दुबई टूर चे बक्षीस मिळेल, केवळ एक नाही तर दोन बक्षिसांची अभिनव योजना सोलापूरचे अग्रणी मिठाई, नमकिन आणि बेकरी उत्पादक नंदकिशोर तिवाडी यांच्या अन्नपूर्णा नमकीन मिठाई आणि बेकरी द्वारे घोषित केली.
दिवाळीच्या खरेदीवर दुबई टूर ची -2 बक्षिसे,  सोन्याचे नाणे- 2 बक्षिसे, आणि चांदीच्या नाण्याची तब्बल- 100 बक्षिसे अशा भरघोस बक्षिसांची मालिका लकी ड्रॉ पद्धतीने संपन्न होत आहे. रविवार दिनांक 1 डिसेंबर रोजी ही सोडत मान्यवरांच्या उपस्थितीत ' विजापूर रोडच्या, मंत्री चंडक पार्क मधील मयूर क्लासिक AC हॉल येथे सकाळी 11 वाजता काढली जाणार आहे. सर्व सन्माननीय कूपन धारकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जे सोडतीच्या वेळेस उपस्थित असतील त्यातूनच विजेते घोषित केले जातील.
      सदर च्या योजनेस प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे नंदकिशोर तिवाडीनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की 1981पासून ग्राहकांच्या विश्वसनीयतेसाठी आम्ही गुणवत्ता, शुद्धता, स्वच्छता अबाधित राखण्यासाठी अविरत परिश्रम घेतले. आज सुमारे 71%पेक्षा अधिक ग्राहक आमचे खरेदीदार आहेत,याचा आम्हाला अभिमान वाटतो.तसेच दर्जा कायम राखण्यास आमच्या उत्पादन विभागाने बजावलेली कामगिरी. त्यानंतर ग्राहकांशी थेट संवाद साधून ऑर्डर्स आणण्यासाठी साठी परिश्रम केलेल्या मार्केटिंग मॅनेजर शैलेश बजाज व टीम मुळे आम्ही हा पल्ला गाठू शकलो.
95 एफएम रेडिओ चे सचिन खानापुरे हे असल्यानेच ही योजना आखली गेल्याचे श्रेय त्यांना नंदकिशोर तिवाडी यांनी दिले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments