मुर्तीजापुर नगरपरिषद हद्दीत शिंदी तलावात अवैध उत्खनाने शासनाला लाखो रुपयांचा चुना....!
मुर्तीजापुर (कटूसत्य वृत्त):- मुर्तीजापुर नगरपंचायत हद्दीत शिंदी तलावाच्या सौंदर्यकरणाच्या नावावर लाखो रुपयांचा निधी उपलब्ध असून काम जोमाने सुरू आहे. पण एका ठेकेदाराने दुसऱ्या ठेकेदाराला त्यातील मुरूम हा रोडवर टाकण्यासाठी विक्री केल्याची धक्कादायक बाब दिनांक दोन डिसेंबरच्या रात्री स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही बाब नागरिकांच्या लक्षात आली .तेथील अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला रात्री आठ वाजता दिल्यानंतर महसूल अधिकारी पोहचले साडेबारा वाजता या कालखंडात दोन पोकलेन व सहा टिप्पर याच्या माध्यमातून अंदाजे दोन हजार ब्रास चे अवैध उत्खनन करून देवरान रस्त्यावर अंदाजे एक किलोमीटर रस्त्यावर या तलावातील मुरूम टाकण्यात आला त्या मुरुमाची शासकीय किंमत लाखो रुपयां असल्याचे नागरिकांचे म्हणणे त्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लावल्याची खमंग चर्चा जनसामान्या नागरिकांमध्ये होत असल्याचे दिसत आहे. शासकीय नियमाप्रमाणे रात्रीचे उत्खनन करता येत नाही. पण हे उत्खनन कोणाच्या आदेशाने सुरू असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. या ठेकेदारावर कोणत्या गॉडफादरचा त्याच्या डोक्यावर हात आहे. . नागरिकांच्या सतर्कते मुळे हा प्रकार थांबवण्यात आला महसूल विभागाचे मंडळ अधिकारी राजू जाधव व तलाठी राजेंद्र पुरी हे घटनास्थळी पोहचले मीडियाने मंडल अधिकारी यांना महसूल प्रशासनावर कारवाईसाठी कमकुवत पडत असल्याचे प्रश्न विचारले मंडल अधिकारी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही.उपस्थित नागरिकांना त्यांनी सांगितले दहा वाजेपर्यंत कारवाई करणार असल्याचे सांगितले. महसूल विभाग या अवैध खनिज उत्खनन करणाऱ्या ठेकेदारावर काय कारवाई करतात . त्या ठेकेदाराच्या टिप्पर व पोकलेन ह्या सुद्धा अजून पर्यंत जप्त करण्यात आल्या नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांनी सदर प्रकरणात कठोर कारवाई करण्यासाठी . सदर नागरिकांनी दिनांक दोन डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, तहसीलदार रवींद्र राऊत, अकोला जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे लेखी तक्रार करून संबंधित ठेकेदारावर गुन्हा नोंद करून योग्य ती कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले. सदर निवेदन मोहम्मद रफी शिरा उद्दीन, फिरोज खान अजमत खान यांनी निवेदन सादर केले.
0 Comments