Hot Posts

6/recent/ticker-posts

मूर्तिजापूर शहर पोलिसांनी आंतरराज्य बकरी चोरी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफार्श......!

 मूर्तिजापूर शहर पोलिसांनी आंतरराज्य बकरी चोरी करणाऱ्या टोळीचा केला  पर्दाफार्श......!

अकोला(कटूसत्य वृत्त):- मुर्तीजापुर:शहर पोलीस स्टेशन हद्दीतील स्टेशन विभागात राहणारे राजेश उर्फ राजू बुंदले यांच्या ३ बकऱ्या, जितेंद्र गोंडाले यांचा १ बोकड , तर सलाउद्दीन उर्फ सल्लूभाई टांगेवाले यांची १ बकरी असे एकूण ५ बकऱ्या  न दिसल्याने सदर व्यक्तींनी मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशनला चोरीची फिर्याद दिली आहे. शहर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक आशिष शिंदे यांना सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्टेशन परिसरातील मारुती  मंदिरा जवळ मारुती स्ट्रीम एमपी ०४ एच ए १२१४ क्रमांकाच्या गाडीमधून बकऱ्या निर्दयीपणे डिक्कीत टाकून चोरून नेत आहे. अशी माहिती प्राप्त झाली असता.. शहर पोलिसांनी ताबडतोब तपासीसूत्रे हलविले.ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे व डीबी स्कॉडचे मुन्ना पांडे, सचिन दुबे, गजानन खेडकर, मंगेश विल्हेकर, विनोद कुंबरे,सोमनाथ फुगे,नामदेव आडे, साजिद मेजर, राजेश वायध,तसेच माना पोलीस स्टेशनचे उमेश हरमकर, पंकज वाघमारे या सर्वांनी भोपाल मधून मूर्तिजापूर येथे बकऱ्या चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपींचा अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ पर्यंत पाठलाग करून अवघ्या काही तासातचं ३ आरोपींना अटक करून ५ बकऱ्या ताब्यात घेण्यात आल्या.यामध्ये आरोपी मोहम्मद फैजान मोहम्मद अमीन वय 35 रा. जमालपुरा भोपाल,वसीम अली अख्तर अली मंडीदीप रायसेन भोपाल वय ३२ वाजीद अली पप्पू खान वय ४० रा. हुजूर जिल्हा भोपाल या तिघांना अटक केली एक आरोपी फरार झाला.अधिक तपास शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहे. 

Reactions

Post a Comment

0 Comments