Hot Posts

6/recent/ticker-posts

रूग्णांच्या ‘हाकेला ओ’ देणारा आरोग्य दूत! राकेश पाटील यांची कामगिरी ठरतेय चर्चेचा विषय

 रूग्णांच्या ‘हाकेला ओ’ देणारा आरोग्य दूत! राकेश पाटील यांची कामगिरी ठरतेय चर्चेचा विषय 


शिरूर (कटूसत्य वृत्त):- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालय असो, जिल्हा स्त्री रुग्णालय असो किंवा इतर कोणतेही खासगी रुग्णालय.. या ठिकाणी रुग्णांना घेऊन येणार्‍या गाव-खेड्यांमधील भोळय़ा-भाबळय़ा नागरिकांना जेव्हा काहीच सुचेनासे होते, तेव्हा त्यांची मदत करण्यास येथील एक ध्येयवेडा आरोग्य दूत सदैव तयार असतो तो म्हणजे सर्वांचा कोल्हापूर जिल्ह्यातील पाट पन्हाळा गावचा पन्हाळा तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील राकेश पाटील

जात, धर्म, पंथ असा कोणताही भेद न करता गरजू रुग्णांना मदत करण्यातून आत्मिक आनंद मिळविणार्‍या या ध्येयवेड्या तरुणाचे नाव आहे, राकेश रामचंद्र पाटील शासकीय रुग्णालयांमध्ये भरती असलेल्या गरजू रुग्णास रक्ताची गरज असो किंवा डॉक्टरांची मदत.. एक फोन करा.. राकेश मदतीला धावून येतो. समाजकार्याचा वसा घेतलेला राकेश हा गत दहा वर्षांपासून सवरेपचार रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय या ठिकाणी गाव-खेड्यांमधून येणार्‍या रुग्णांना सर्व प्रकारची मदत करीत आहे. राकेश पाटील यांचे वडील जिल्हा परिषद शाळे वरती मुख्याध्यापक झालेल्या असून त्यांनी आपल्या मुलाला घडविण्यात मोलाचे योगदान दिले आहे मानवी रक्ताला दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे केवळ रक्तदानातून ही गजर पूर्ण करता येते, हे चांगल्याप्रकारे ओळखून असलेला राकेश हा रक्तदान शिबिरांचे आयोजन करून, सवरेपचार रुग्णालयाच्या रक्तपेढीला मदत करतो. त्याने आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने आतापर्यंत 350 ऑपरेशन मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून करून घेतले आहेत एवढेच नव्हे, तर त्याने स्वत: गरजूंना मुख्यमंत्री सहायता निधी च्या माध्यमातून पावणेदोन कोटी पर्यंत मदत मिळवून देण्यास मोलाचे योगदान दिले आहे याशिवाय गावागावांमध्ये जाऊन तेथील युवकांना सैनिक मेळावे घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. त्याच्या प्रोत्साहनामुळे गतवर्षी ग्रामीण भागात अनेक जिल्ह्यांमध्ये गरजू रुग्णांना मदत झाली आहे सवरेपचार रुग्णलयात भरती असलेल्या रुग्णांनाही राकेश मदत करतो. राकेश चे या सेवाभावी वृत्तीमुळे सवरेपचारमधील डॉक्टरही त्याला मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात. लोकांची सेवा करण्याचे ब्रिद घेतलेल्या राकेश पाटिल अनेक सामाजिक संस्थांनी गौरव केला आहे. राकेश हा रुग्णांच्या मदतीसोबतच गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यातही नेहमीच पुढे असतो. सामाजिक सलोखा ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. प्रत्येकाशी विन्रमतेने संवाद साधणार्‍या राकेश लाघवीपणा त्याच्या सेवा कार्याला संस्मरणीय करतो.

खा लंकेंमुळे आयुष्यात रुग्णांची सेवा करू शकलो 
घरची परिस्थिती जेमतेम परंतु वडिलांचे सामाजिक सेवेतले योगदान पाहून मी आज सामाजिक कार्यात आहे  मी कुठल्याही पद्धतीचे राजकारण करणार नाही आणि आरोग्य सेवेचा वसा सोडणार नाही  आरोग्य सेवा हे माझ्या रक्तात आहे

Reactions

Post a Comment

0 Comments