महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे महसूल वनविभाग सचिवाना निवेदन
कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्यध्यक्ष टी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे महसूल व वनविभाग सचिव यांना ऍग्रीस्टॅक प्रकल्प अंमलबजावणी नाकारणारे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटल्याप्रमाणे
2024-25 आर्थिक वर्ष सुरु झाले पासून लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. निवडणूक काळात आचारसंहिता कालावधी मोठा होता.त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील वैयक्तिक लाभांच्या योजनाची अंमलबजावणी ग्रामपंचायतीस केंद्र व राज्य सरकारकडून प्राप्त निधी अखर्चित आहे.केंद्र व राज्य शासनाचे ध्वजांकित महत्वकांशी प्रकल्प अंमलबजावणी महत्त्वाची असल्याने ते उद्दिष्ट पूर्ण करणे, प्रधानमंत्री आवास दोन टप्पा सर्वेक्षण करणे,कर वसुली इत्यादी महत्वाची कामे प्रलंबित आहेत.सदरची संपूर्ण कामे मार्च 2025 पर्यंत पूर्ण करणेची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाची असल्याने संदर्भीय शासन निर्णयानुसार अग्रीस्टॉक प्रकल्प अंमलबजावणीस वेळ मिळणार नाही त्यामुळे सदरचे काम नाकारत आहोत.सदरचे निवेदन उपविभागीय दंडाधिकारी प्रियंका आंबेकर यांनी स्विकारले. याप्रसंगी संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी लोकरे, तालुकाध्यक्ष प्रताप गवळी, सचिव नवनाथ दौंड कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन शंकर गवळी उपस्थित होते.
0 Comments