शिरूर हवेलीत अशोक बापू आणि शांताराम बापू एकत्र येण्याने
आ. अशोक पवारांना मिळणार पाठबळ
शिरूर हवेली (कटूसत्य वृत्त):-सध्या राज्याच्या राजकारणामध्ये प्रचंड उलथापालथ होत असताना अनेक ठिकाणी पक्षांतरे चालू आहेत तर कुठे कोणी बंडखोरी करण्याच्या तयारीत होय याच मतदारसंघांमध्ये "हवेली विधानसभा मतदारसंघात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. आज राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी गटाचे माजी जिल्हाध्यक्ष व पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक शांताराम कटके यांनी शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. शिरूर हवेली तालुक्यांच्या विकासासाठी आम्ही दोन्ही बापू एकत्र आल्याचे यावेळी कटके यांनी सांगितले व या मतदारसंघाला विकास कामांच्या माध्यमातून वेगळ्या उंची वरती नेहून ठेवण्याचे असल्याचे सांगितले
आज वाघोली येथे कटके यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये आ. अशोक पवार व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला पाठिंबा जाहीर केला. आपण इतकी वर्षे अजित पवार यांच्याशी निष्ठेने काम केले. पक्षात अनेक सक्षम उमेदवार असताना अजित पवार यांनी शिवसेनेचा आयात उमेदवार शिरूर व हवेलीकरांच्या माथी मारला आहे. दिलेला उमेदवार याचा अजित पवार व पक्षाच्या मूल्यांशी अजिबात संबंध नसल्याने आपण उमेदवारी मागे घेत आ अशोक पवार यांना पाठिंबा दिला आहे, असे कटके यांनी म्हटले."
माघार घेण्याच्या दिवशी माघार घेत अपक्ष भाऊसाहेब जाधव व शिवाजी कदम यांनी आ. अशोक पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला, तर आज अजित पवार गटाचे खंदे समर्थक शांताराम कटके यांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे आ. पवार यांची ताकद वाढली आहे. शांताराम कटके यांचा वाघोलीसह हवेली तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहे याच जनसंपर्काचा फायदा आ अशोक पवार यांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दोन्ही बापू एकत्रित आल्याने हे निवडणूक चर्चेचे येणारं आहे व पवार कटके युतीने पवारांना याचा राजकीय नक्कीच फायदा होणार असल्याचे राजकीय विश्लेषक बोलत आहेत
0 Comments