सुभाष देशमुख यांना तिसऱ्यांदा आमदार करण्यासाठी इच्छा भगवंताची परिवार उचलणार सिंहाचा वाटा :-किसन जाधव
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार
सुभाष देशमुख यांनी दिली किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच इच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक किसन जाधव यांच्या रेल्वे लाईन्स येथील संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान,ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, प्रांतिक सदस्य महेश निकंबे, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, भाजपाचे विशाल गायकवाड,अमोल गायकवाड, महेश देवकर, अभिजित बिराजदार, विशाल पाटील,राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे, राष्ट्रवादी शहर सेक्रेटरी प्रमोद भोसले,सागर कांबळे, राष्ट्रवादी शहर सरचिटणीस निलेश कांबळे, अमोल जगताप, अशोक जाधव,सिध्दु गायकवाड, अनिस जाधव, अंबादास वैष्णव,जितू भोसले,तेजस गायकवाड, कार्तिक जाधव, उत्कर्ष गायकवाड, ऋषी येवले, शुभम गायकवाड, माऊली जरग, दया जाधव, महादेव राठोड, माणिक कांबळे, वसंत कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मताधिक्याने विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना केल्या होत्या त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी जोमाने कामाला लागले आहेत दक्षिण सोलापूर मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुभाष देशमुख यांना तिसऱ्यांदा आमदार करण्यासाठी इच्छा भगवंताची परिवार हा सिंहाचा वाटा उचलणार असल्याचे मनोगत यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी व्यक्त केलं. दरम्यान यावेळी किसन जाधव यांनी इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीने आमदार सुभाष देशमुख यांचे यथोचित सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि इच्छा भगवंताची परिवार सर्वाधिक मताधिक्य देईल अशी ग्वाही देखील त्यांनी आमदार सुभाष देशमुख यांना यावेळी दिला. यावेळी बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले की इच्छा भगवंताची परिवाराचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली परिवार कार्य करीत आहे नक्कीच इच्छा भगवंताची परिवार माझ्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलतील यामध्ये तिळमात्र शंका नाही असे मनोगत यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह उपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुभाष देशमुख यांना तिसऱ्यांदा आमदार होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments