Hot Posts

6/recent/ticker-posts

देशाला संविधान देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने अपमान केला---- योगी आदित्यनाथ महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन

 देशाला संविधान देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने

 अपमान केला -योगी आदित्यनाथ  

महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन 

 मुर्तिजापुर(कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्राची भूमी संत व शूरवीरांची आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक सद्यस्थितीत दोन गठबंधनामध्ये होत आहे. महायुती गठबंधन आणि महाविकास आघाडी गठबंधनामध्ये निवडणूक लढवली जात असताना एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहयोगी यांच्या नेतृत्वातील एनडीए महायुतीचे सरकार देशांतर्गत चौफेर विकास,राष्ट्रसुरक्षा,संप्रभूता, विरासत, गरिबांकरिता कल्याणकारी योजना,पायाभूत सुविधा,सर्वांना नळाद्वारे पाणी, गरिबांना पक्की घरे,८० कोटी लोकांना मोफत धान्य अशा विविध योजनांचा देशाला विकासाच्या मार्गावर सातत्याने घेऊन जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीवाले

 भ्रष्टाचारी,अराजकता आणि अधर्मी यांची गळाभेट घेणारे असून त्यांना राष्ट्रधर्माशी काहीही देणे घेणे नाही. त्यामुळे मी त्यांना महाअनाडी म्हणतो. आम्ही म्हणतो की तेरा वैभव अमर रहे मां--चाहे हम रहे या ना रहे. तर महाविकास आघाडीवाले म्हणतात मेरा वैभव अमर रहे चाहे तुम रहो या ना रहो. त्यामुळे मी तुम्हाला यांच्यापासून सावधान करण्याकरिता आलो आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले.परंतु काँग्रेसने डॉ.बाबासाहेबांचा अपमान केला.आता पाकिस्तान भारतात अराजकता आणि सिमारेषेतून अंदर घुसखोरी करण्याचे दुस्साहस करण्याची हिम्मत करुन शकत नाही. मोदीजींची नेतृत्वातील सरकार आल्यापासून काश्मीरमधील घुसखोरी बंद झाली असून दगडफेक नियंत्रणात आली आहे. आम्ही जेव्हा जेव्हा जाती-धर्माच्या नावावर वाटल्या गेलो तेव्हा तेव्हा बटे थे--तो कटे थे असे प्रतिपादन भाजपाचे स्टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मूर्तिजापूर येथे आले असता आयोजित  प्रचार सभेत बोलत असताना केले.सदर सभा ही येथील जिल्हा परिषद लाल शाळा शिवाजीनगर येथे पार पडली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आगमन होण्यापूर्वी खासदार अनुप धोत्रे तसेच आमदार हरीष पिंपळे,अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे आदींनी आपले विचार मांडले. व्यासपीठावर मध्य प्रदेशचे क्रीडामंत्री विश्वास सारंग,बऱ्हाणपूरचे महापौर,तसेच खासदार ज्ञानेश्वर पाटील यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

    व्यासपीठावर योगी आदित्यनाथ यांचे आगमन झाल्यानंतर आमदार हरीष पिंपळे यांनी स्वागता निमित्त विचार मांडताना मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन येथे विविध रेल्वे गाड्या थांबविण्यासाठी मदत करण्याची मागणी खासदार अनुप धोत्रे व्यासपीठावर उपस्थित असताना त्यांच्यासमोरच थेट योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली.

Reactions

Post a Comment

0 Comments