पंढरपूर मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 8, 12 व 16 नोव्हेंबर रोजी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 7, 2024

पंढरपूर मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 8, 12 व 16 नोव्हेंबर रोजी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

 पंढरपूर मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा

 तपासणी 8, 12 व 16 नोव्हेंबर रोजी उमेदवार किंवा

 त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

पंढरपूर, (कटूसत्य वृत्त):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च लेखा तपासणी 8, 12 व 16 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येणार आहे. सदर खर्च तपासणी वेळी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


  लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 77 मधील तरतुदीनुसार निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचे अभिलेखे उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे. त्यानुसार प्रथम खर्च लेखा तपासणी शुक्रवार दि. 8 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत, द्वितीय खर्च लेखा तपासणी मंगळवार, दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत तर तृतीय खर्च लेखा तपासणी शनिवार दि. 16 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत शेतकी भवन, पंचायत समिती, पंढरपूर येथे करण्यात येईल.

252-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक के.पी. जेयकर हे वरील दिनांकास व वेळेस शेतकी भवन, पंचायत समिती, पंढरपूर येथे खर्च तपासणीकरीता उपलब्ध राहणार आहे. जे उमेदवार खर्चाचे लेखे तपासणीकरीता सादर करणार नाही, त्यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे 252 पंढरपूर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी कळविले आहे.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages