शहर उत्तरमध्ये आमची तुतारी वाजणारच हा आत्मविश्वास -महेश कोठे
मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. दरम्यान, दिवसेंदिवस या पदयात्रेमध्ये
नागरिकांची गर्दी वाढू लागल्याने शहर उत्तरमध्ये आमची तुतारी वाजणारच असल्याचा
आत्मविश्वास माजी महापौर तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश कोठे यांनी
माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला.आज बुधवार, दि. ०६ नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक ११ मध्ये महेश कोठे यांनी भव्य पदयात्रा काढली. ढोल, ताशांच्या तालावर ही पदयात्रा मार्गस्थ झाली. या मतदारसंघातील ठिक-ठिकाणी महिलांनी महेश कोठे यांचे औक्षण केले तर अनेक नागरिकांनी पुष्पगुच्छ देत आणि हार घालून स्वागत केले. यावेळी जोरदार फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. महेश अण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणांनी अवघा परिसर दणाणून जात होता. या पदयात्रेत हजारो नागरिकांसह अबालवृध्दांचाही समावेश होता.यंदा शहर उत्तरमध्ये परिवर्तन अटळ यावेळी माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनीही आपली प्रतिक्रिया नोंदविली. ते म्हणाले की, महेश अण्णांच्या पाठीशी या भागातील तमाम नागरिक उभे राहिल्याने त्यांचा विजय निश्चित असून, यंदा शहर उत्तरमध्ये परिवर्तन अटळ असल्याचे सांगितले. जनतेने सांगेल ते काम करणारा नेता म्हणून महेश अण्णा यांची ख्याती असून, भविष्यातही अण्णांमुळेच या मतदारसंघाचा कायापालट होईल.
0 Comments