कोगनुरे यांनी केले राज ठाकरेंचे स्वागत
हंजगी (कटूसत्य वृत्त):- मंगळवेढा येथील सभेसाठी आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सोलापूर विमानतळावर आगमन होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी जल्लोषात स्वागत केले.यावेळी मंगळवेढा - पंढरपूर मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर,प्रशांत इंगळे, जैनुद्दीन शेख, रोहित कलशेट्टी, सत्तार सय्यद, निलेश भंडारे, आकाश निंबाळकर, विशाल गुजले,पवन देसाई, यश महिंद्रकर, दिनेश हंचाटे, राहुल अक्कलवाडे, प्रदीप बंडे, अनिल भिसे, सुरेखा गोब्बुर, बी. के.किआरा आदींसह एम. के.फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments