हत्तुरे वस्ती परिसरातून काडादी यांना मताधिक्य देणार : हत्तुरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 11, 2024

हत्तुरे वस्ती परिसरातून काडादी यांना मताधिक्य देणार : हत्तुरे

 हत्तुरे वस्ती परिसरातून काडादी यांना मताधिक्य देणार : हत्तुरे



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-विधानसभा निवडणुकीसाठी यंदा चरित्र संपन्न, संयमी, सुशील असे उमेदवार धर्मराज काडादी यांच्या
रूपाने लाभले आहेत. त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. त्यामुळे हत्तुरे वस्ती परिसरातून त्यांना मोठे
मताधिक्य देऊ, अशी ग्वाही माजी नगरसेवक अप्पासाहेब हत्तुरे यांनी दिली.


शनिवारी, सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी
हत्तुरे वस्ती परिसरात भेट देऊन मतदारांशी संवाद साधला. प्रारंभी हत्तुरे यांनी काडादी यांचे स्वागत केले. तर दऱ्याप्पा हत्तुरे यांचा वाढदिवसानिमित्त काडादी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना काडादी म्हणाले, मतदारसंघातील ग्रामीण आणि शहरी भागातील समस्यांची आपल्याला जाण आहे. गटातटाचे राजकारण न करता, जात- पात न पाहता समतोल विकास साधण्याचा आपला प्रयत्न राहील. असे सांगून ज्येष्ठ नेते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या आशीर्वादाने आणि पाठिंब्याने अपक्ष म्हणून आपण ही निवडणूक लढवत असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक चंद्रकांत नवत्रे यांनी केले.


यावेळी बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकोते, माजी नगरसेवक मधुकर आठवले, सोमनिंग वरनाळे गुरुजी, गिरीमल पडसलगी, मल्लिकार्जुन गुरव, अशोक पाटील, वैजीनाथ हत्तुरे, लक्ष्मीकांत पनशेट्टी, रितेश हत्तुरे आदींसह हत्तुरे वस्ती परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages