आमदार कल्याणशेट्टी यांनी साधला पुण्यातील रहिवाशांशी संवाद
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि. १०-
पुणेकरांनी गेल्या वेळी मला खूप मोठी साथ दिली होती. यावेळी सुध्दा माझ्या पाठीशी कायम राहतील, असा विश्वास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला.
अक्कलकोट, दि. १०-
पुणेकरांनी गेल्या वेळी मला खूप मोठी साथ दिली होती. यावेळी सुध्दा माझ्या पाठीशी कायम राहतील, असा विश्वास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला.
रविवारी, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील पुणे शहर आणि परिसरात राहणाऱ्या रहिवासी बांधवांच्या स्नेह संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला उपस्थित राहन नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पुणे शहरात राहणाऱ्या आपल्या अक्कलकोटमधील रहिवासी बांधवांना भेटून राज्यात पुन्हा महायुती सरकार आणण्यासाठी मला आशीर्वाद देण्याची विनंती केली. यावेळी आपल्या अक्कलकोट मतदारसंघात झालेली विविध विकासकामे, विविध प्रकल्प, गावांचा झालेला
कायापालट याची माहिती वांधवांना दिली. २० नोव्हेंबर या दिवशी 'कमळ' या चिन्हासमोरील बटण
दावून विजयी करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
यावेळी आनंद तानवडे, शांताराम पाटील, मधुकर सुरवसे, शिवशंकर विराजदार, अतुल कोकाटे, वाळा शिंदे, शिवा फुलारी, महेश मुळे, राहुल काळे, काशीनाथ प्रचंडे, सागर काळे, सुरेश गड्डी, डॉ. सागर हिप्परगी, अमित कोतमिरे, लिंगराज मठपती, इरेश वागेवाडी, संगप्पा चानकोटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमावेळी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुती मित्रपक्षातील वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, नेतेमंडळी आणि पुणे शहरात वास्तव्य असणारे अक्कलकोट तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
0 Comments