Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपचा 'संकल्पपत्र'

 भाजपचा 'संकल्पपत्र'


लाडकी बहीणच्या मानधनात वाढ, शेतकऱ्यांना हमीभाव


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीयमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत रविवारी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपने या जाहीरनाम्याला 'संकल्पपत्र' असे नाव दिले असून या संकल्पपत्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढविले. शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.


यावेळी बोलताना शहा यांनी भाजप सरकारने मागच्या दहा वर्षांत मोठी कामे केली असे सांगताना उद्धव ठाकरेंसह शरद पवार आणि काँग्रेसवरही निशाणा साधला. तुम्ही केलेल्या कामांचा हिशेब तुम्ही जनतेसमोर ठेवा. आघाडी सरकारच्या काळात जनतेला खूप त्रास सहन करावा लागला, असे त्यांनी म्हटले. तसेच यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवारच्या कामांचेही कौतुक केले. यावेळी संकल्पपत्र म्हणजे विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप असणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

भाजपच्या संकल्पपत्रामधील सर्वात मोठी घोषणा म्हणजे लाडकी बहीण आणि वृद्ध पेन्शन योजनेच्या मानधनामध्ये वाढ करण्याती आली असून आता २१०० रूपये देण्यात येणार आहेत. भावांतर योजना, पिकाचा भाव पडल्यावर हमीभावापेक्षा जास्त दर आणि त्याचे
पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. शेतमालाची हमीभावाने खरेदी करणार, महाराष्ट्रात २०२७ पर्यंत ५० लाख लखपती दीदी करणार, महारथीमार्फत मोठ्या लॅब तयार
करणार, गड-किल्ल्यांच्या विकासासाठी प्राधिणीकरण, एक लाखांपेक्षा जास्त सरकारी नोकऱ्या देणार..


भाजप संकल्पपत्रामधील घोषणा
लाडकी बहीण योजनेतील महिलांना १५00 रुपयांवरुन २१०० रुपये दिले जाणार. महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण,
महिलांच्या सुरक्षेसाठी २५000 महिलांचा पोलीस दलात समावेश केला जाणार. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार. शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १२ हजार वरुन १५ हजार,
Reactions

Post a Comment

0 Comments