महाविकास आघाडीचा 'महाराष्ट्रनामा'
मुंबई, दि. १०
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिध्द केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात ५०० रुपयांत गॅस सिलिंडर आणि महिलांना दरमहा तीन हजार रुपये भत्ता तसेच महिलांना बसप्रवास मोफत अशी अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याला 'महाराष्ट्रनामा' असे नाव देण्यात आले आहे.
यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आदी नेते उपस्थित होते.
महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिध्द करताना खर्गे म्हणाले, आम्ही महाराष्ट्र निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिध्द करत आहोत. महाराष्ट्राची निवडणूक ही देशासाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. ही निवडणूक देशाचे भवितव्य बदलणारी आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणले
तरच येथे स्थिर आणि सुशासन येईल. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी आमचे पाच स्तंभ देणार आहेत. यामध्ये कृषी व ग्रामविकास, उद्योग व रोजगार, नगरविकास, पर्यावरण व लोककल्याण या विषयांवर आधारित आमचा जाहीरनामा आधारित आहे.
खर्गे पुढे म्हणाले, नोकरी शोधणाऱ्या तरुणांना दरमहा चार हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. काँग्रेसच्या राजस्थान येथील अशोक गहलोत सरकारने २५ लाख रुपयांची आरोग्य विमा योजना सुरू केली आहे. महाराष्ट्रातही सत्ता आल्यास या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना मोफत औषधे देण्याचे आश्वासनदेखील खर्गे यांनी
दिले आहे. आम्ही जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. खर्गे म्हणाले की, जातीय जनगणनेचा उद्देश लोकांमध्ये फूट पाडणे हा नसून विविध समुदायाची स्थिती काय आहे हे समजून घेणे हा आमचा उद्देश असून यामुळे त्यांना चांगले आर्थिक लाभ देता येतील.
जेणेकरून त्यांना अधिक लाभ मिळू शकतील.
महाविकास आघाडीचा जाहीरनामा
महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना तीन हजार रुपये दर महिन्याला देण्यात येणार, महिलांना बस प्रवास मोफत असणार, सहा सिलिंडर ५०० रुपयांमध्ये देणार, महिला मुलींसाठी निर्भय महाराष्ट्र धोरण आखण्यात येईल, मुलींसाठी मोफत सर्व्हायकल कॅन्सर लस, बचत गट सक्षमीकरणासाठी स्वतंत्र विभाग,
0 Comments