Hot Posts

6/recent/ticker-posts

माढ्यासह राज्यात परिवर्तन अटळ : अभिजित पाटील

 माढ्यासह राज्यात परिवर्तन अटळ : अभिजित पाटील



पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-
तीस वर्षे आमदारकी असतानाही तुळशीसारख्या गावात आजही पिण्याचे पाणी नाही. येथील म लांची लग्ने जमत नाहीत. पुढील एक वर्षाच्या आत तुळशीला पाणी तर आणूच पण दोन वर्षात मतदारसंघातील सर्व रस्ते पक्के करू, असे आश्वासन माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांनी दिले. यावेळी त्यांनी माढ्यासह राज्यात परिवर्तन अटळ असल्याचे सांगितले.


तुळशी (ता. माढा) येथे आयोजित प्रचारसभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, ह.भ.प. मधुकर नाईकनवरे, भारत पाटील, विजय भगत, सूरज देशमुख, दादासाहेब नाईक, शिवाजी मोरे, नागेश दगडे, बापूसाहेब दगडे, नारायण माळी, विशाल व्हनमाने, नामदेव खांडेकर, मोहित मोरे, मनोज शहा, बापूसाहेब गव्हाणे, विनायक वसेकर, संदीप कुलकर्णी, प्रमोद गव्हाणे उपस्थित होते.

यावेळी पाटील यांनी, स्वतःच्या कामाचा अनुभव सांगताना बंद पडलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना ताब्यात घेऊन चालू करून दाखवला. एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या उसाला जादा दर देण्यास सर्व कारखानदारांना भाग पाडले. त्यातून एकाच हंगामात तब्बल साडेआठशे कोटी रुपये ज्यादा शेतकऱ्यांना मिळवून दिले. हे आपण शेतकऱ्यांचे दुःख जाणत असल्याने करू शकलो, असे सांगितले. आजपर्यंत जे जे बोललो ते खरे करून दाखवले आहे. विरोधकांनी मात्र आधी शरद पवार यांना धोका दिला आणि आता ऐन निवडणुकीत अजितदादांना धोका दिला आहे. त्यामुळे विकासकामांसाठी एकदा संधी द्या आणि
आमदाराच्या पोरालाच पुन्हा आमदार करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पोराला आमदार करा, असे आवाहन त्यांनी केले. सलग तीस वर्षे आमदारकी ताब्यात यावेळी पक्षाने तिकीट का दिले नाही, याचा विरोधकांनी आणि मतदारांनी विचार करावा असे सांगून आपल्याला शरद पवार यांनी तिकीट दिले, आता जनता आमदार करणार, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. रविवारी टेंभुर्णी येथे विधानसभा निवडणूकीच्या अनुषंघाने अमर पाटील यांच्या उपस्थितीत हृपिकेश वोवडे यांनी बैठक बोलावली होती. यामध्ये सर्वांची मते जाणून घेऊन येत्या विधानसभा निवडणुकीत अभिजित पाटील यांना सर्वांनी एकमुखी पाठिंवा जाहीर केला. त्यावेळी माजी सरपंच प्रमोद कुटे, ऋषिकेश वंटीनाना वोवडे, डॉ. राहुल पाटील, डॉ. सोमनाथ साळुंखे, संजय देशमुख, विनोद देशमुख, सचिन देशमुख उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments