Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री गणपती फार्मसीच्या ३ विद्यार्थ्यांची अँडव्हान्टमेंड इंडिया, अहमदाबादमध्ये निवड

 श्री गणपती फार्मसीच्या ३ विद्यार्थ्यांची अँडव्हान्टमेंड इंडिया, अहमदाबादमध्ये निवड






टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च टेंभुर्णी येथील विद्यार्थी अक्षय लोकरे, अजित राऊत व निहाल कोर्बु यांची गांधीनगर अहमदाबाद येथील मेडिकल कोडींग कंपनी अँडव्हॉन्टमेड इंडिया एलएलपी मध्ये निवड झाली असून त्याबद्दल महाविद्यालयात त्यांचा सत्कार आयोजित केला होता.
याप्रसंगी कार्यक्रमात बोलताना सचिव प्रा. डॉ. रवींद्र बेंदगुडे यांनी त्यांचे अभिनंदन केले व थोडक्यात महाविद्यालयाने मागील वर्षी विविध प्रकारचे व्याख्याने, कार्यशाळा घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील दिशा अवगत झाल्या व त्यामुळे त्यांना आपले क्षेत्र निवडण्यासाठी मदत झाल्याचे सांगितले. यावेळी अक्षय लोकरे व निहाल कोर्बु यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयात घेतलेल्या वेगवेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी फायदा झाला असून व सध्या मेडिकल कोडींग मध्ये विद्यार्थ्यांना भरपूर संधी उपलब्ध असून त्यासाठीची तयारी महाविद्यालयीन शिक्षण घेताना घेत असताना केल्यास नंतर जास्त वेळ वाया जात नाही याची कबुली दिली. यावेळी प्रा. शिवराज ढगे यांनी सध्या चतुर्थ वर्ष पदवी विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा घेऊन आपले करिअर निवडणे आवश्यक असून यामुळे त्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची तयारी करणे सोप्पे जाईल व महाविद्यालयामध्ये जात असलेल्या कार्यशाळा, व्याख्याने याचा मुलानी पुरेपूर फायदा करून घेण्याचेही आवाहन केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे, डॉ. प्रशांत मिसाळ, ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. नामदेव शिंदे, प्रा. शिवराज ढगे, प्रा. अक्षय भेंकी, प्रा. कोमल साळुंखे, प्रा. प्रियांका खडसरे, प्रा. गंगा गोरे आदी शिक्षक उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष ॲड. विजयराव हिरवे व उपाध्यक्ष श्री. बाबा येडगे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments