श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचा ४३ वा बॉयलर अग्निप्रदिपन सभारंभ संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 7, 2024

श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचा ४३ वा बॉयलर अग्निप्रदिपन सभारंभ संपन्न

 श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचा ४३ वा बॉयलर अग्निप्रदिपन 

सभारंभ संपन्न


पंढरपूर, (कटूसत्य वृत्त):-  श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचा सन २०२४-२५ गळीत हंगामाचा ४३ वा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ गुरुवार दिनांक ०७.११.२०२४ रोजी सकाळी ९.१५ वाजता या शुभसमयी ह. भ. प. श्री मोहन (बापू) महाराज पाटील यांचे शुभहस्ते व होमहवन पुजन कारखान्याचे कार्यकारी संचालक मा. श्री रविंद्र भास्कर पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.जयश्री रविंद्र पाटील, स्वेरी कॉलेज संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे सर यांचे उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला.

सदर कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर  डी. आर. गायकवाड हे प्रास्ताविकपर भाषणात बोलताना म्हणाले की, मा.चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याने गत दोन गळीत हंगाम उच्चांकी गाळप केले आहे. हा गळीत हंगाम यशस्वी पार पाडणेसाठी कारखान्याकडे ४०१४५ एकर ऊसाची नोंद झालेली असून त्यामधुन १२.१० लाख मे.टन ऊसाचे गाळप होईल. ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांच्या ऊसाचे वेळेत गाळप होणेसाठी कारखान्याने पुरेशी ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा उभी केलेली आहे.

याप्रसंगी ह.भ.प.श्री मोहन (बापू) महाराज पाटील हे आपल्या अध्यात्मिक शैलीमध्ये विचार व्यक्त करताना म्हणाले की, श्री विठ्ठल कारखान्यामागे फार मोठी आध्यात्मिक शक्ती असून श्री विठ्ठल कारखान्याला अनेक साधू संताचे आशिर्वाद लाभले आहेत. कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे जनतेचे प्रश्न सोडविणेसाठी सतत प्रयत्नशिल असून त्यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना निश्चित प्रगतीपथावर राहील, असे ते म्हणाले व पुढील गळीत हंगाम यशस्वी होणेसाठी शुभेच्छा दिल्या. 

सदर कार्यक्रम प्रसंगी बोलताना स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे सर म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन मा.अभिजीत आबा पाटील यांचे नेतृत्वात कारखान्याने गत दोन गळीत हंगाम उत्कृष्टपणे चालविले आहेत. हा गळीत हंगाम ही यशस्वीपणे पार पाडणेसाठी सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांनी आपला पिकविलेला संपुर्ण ऊस आपले श्री विठ्ठल कारखान्यास दयावा, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी क्रांतीताई दत्तू, कारखान्याचे संचालक प्रा.तुकाराम मस्के सर यांनी ही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री विठ्ठल प्रशालेचे चव्हाण सर व कार्यक्रमाचे आभार संचालक  दिनकर चव्हाण यांनी मांडले.

या कार्यक्रमासाठी कारखान्याचे संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, श्रीमती कलावती खटके, सौ सविता रणदिवे, तज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अशोक तोंडले, धनाजी खरात, उमेश मोरे, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, गणेश ननवरे, समाधान गाजरे, आजी-माजी नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, विविध गावचे सरपंच, कारखान्याचे सभासद,ऊस पुरवठादा शेतकरी, अधिकारी व कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, व्यापारी व हितचिंतक उपस्थिती होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages