फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी दाखवली 'पाॅवर' म्हणाले - यंदा जनता परिवर्तनाच्या मुडमध्ये!
नागपूर(कटूसत्य वृत्त):- भाजपचे धुरंधर नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्ल्यात महाविकास आघाडीने जोरदार पाॅवर दाखवली.महाविकास आघाडीची पुर्व नागपूर मतदारसंघात सभा झाली. या सभेत जनता परिवर्तनाच्या मु़डमध्ये असल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
सत्ता येणारच, शरद पवारांचा विश्वास
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाआघाडीच्या विजयावर पूर्ण विश्वास असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सकाळी त्यांचे नागपुरात आगमन झाले. पूर्व नागपूर मतदारसंघात दुनेश्वर पेठे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा होती, हे नेते मंडळी आज त्याच सभेत बोलत होते.
जातीय जनगणनेवर भूमिका
महाराष्ट्रातील जनतेला परिवर्तन हवे आहे, याची आम्हाला जाणीव आहे, आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या साठी मी नागपुरात आलो असून तीन सभांच्या दौऱ्यानंतर हिंगणघाट क्षेत्रात जाणार आहे. माझा दौरा 18 तारखेपर्यंत चालणार आहे. असे शरद पवार यांनी सांगितले.यावेळी त्यांनी जातीय जनगणनेविषयी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केले केली.
आरक्षणावर मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेऊ
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, जातीय जनगणना होणार, आरक्षणाची मर्यादा तोडून 50 टक्क्यांवर न्यायची वेळ आली आहे, त्यावर शरद पवार म्हणाले की, "मी माझ्या पक्षाची भूमिका सांगतो. जातीय जगनणनेची मागणी आम्ही मागच्या तीन वर्षांपासून करत आहोत. ती झालीच पाहिजे, त्यातून वास्तव चित्र देशासमोर येईल. ते आल्यानंतरच आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंबंधी निर्णय घेता येईल" असे शरद पवार म्हणाले
शरद पवारांनी मांडले हे मुद्दे
पाच वर्षाच्या पूर्वी लोकसभेच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला एक जागा मिळाली होती. आणि राष्ट्रवादीचा 4 जागा मिळाल्या होत्या मात्र जी निवडणुक झाली त्यात परिवर्तन घडले जवळपास 38 जागा मिळाल्या. देशाची सत्ता मोदी यांच्याकडे आहे. त्यांना स्पष्ट बहुमत नसताना देखिल मित्र पक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ज्या घरात आत्महत्या केली त्यांच्या घरातील लोकांना भेटलो. खतांच्या किमती वाढल्या पण शेतकऱ्यांच्या मालाला किंमत मिळत नाही. देशातील शेतकरी अस्वस्थ आहेत. त्यांना आपल्याला शेतकऱ्यांना संकतून बाहेर काढायचे आहे. महालक्ष्मी योजनेच्या माध्यमांतून महिलांना 3 हजार रुपये दिला जाईल तसेच महिलांना मोफत एस टी प्रवास दिला जाईल. 25 लाख रुपये आरोग्य विमा दिला जाईल असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. महविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, पाच वर्षे सुसाशनच सरकार चालवून असा मी आपल्याला आश्वासन देतो.
0 Comments