Hot Posts

6/recent/ticker-posts

विकासाची दृष्टी नसलेल्यांना घरी बसविण्याची गरज- काडादी

 विकासाची दृष्टी नसलेल्यांना घरी बसविण्याची गरज- काडादी


सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- विकासाची दृष्टी नसलेल्या लोकप्रतिनिधींमुळे गेल्या दहा वर्षांत दक्षिण सोलापूर तालुक्याचे वाटोळे झाले. संस्थात्मक काम करणे दूरच अनेक सहकारी संस्था मोडकळीस आणण्याचे काम केले.  दक्षिण सोलापूर तालुका आणि जुळे सोलापूर विकासापासून वंचित ठेवणा//र्‍यांस आता घरी बसविण्याची गरज असल्याचे आवाहन अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी केले. 
 दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख अपक्ष उमेदवार  काडादी यांच्या गावभेट दौ//र्‍यास नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील घोडा तांडा, मद्रे, सिंदखेड, संजवाड, औराद, राजूर, बिरनाळ आणि होनमुर्गी या गावांमध्ये नागरिकांनी काडादी यांचे जल्लोषात स्वागत केले. 
यावेळी श्री स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्यासह सिध्देश्वर परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहकारी क्षेत्रामध्ये श्री सिध्देश्वर साखर कारखान्याने यशाचा मापदंड निर्माण केला आहे. शेतक//र्‍यांच्या उसाला चांगला दर देण्याची परंपरा सिध्देश्वर कारखान्याने निर्माण केली आहे. हा कारखाना बंद पाडल्यानंतरच आपले खासगी कारखाने चांगल्या पध्दतीने चालतील हा कुटील डाव मांडणा//र्‍यांना आपण सारे चांगलेच ओळखून आहोत. शेतक//र्‍यांना नडणारे भाजप सरकार आणि गेल्या दहा वर्षांपासून सुडाचे राजकारण करणा//र्‍या आमदारांना जागा दाखविण्याची गरज असल्याचे काडादी यांनी सांगितले.
दक्षिण सोलापूर तालुक्याला सर्वसमावेशक नेतृत्वाचा मोठा वारसा आहे. शेवटच्या माणसाच्या मदतीला येण्यासाठी सहकारमहर्षी वि. गु. शिवदारे, आनंदराव देवकते, ब्रह्मदेवदादा माने, गुरूनाथ पाटील, लोकनेते बाबूरावअण्णा चाकोते, दी. शि. कमळे गुरुजी  यांच्यासारख्या नेत्यांचा सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा वारसा आपण जपला आहे. सुडाचे, द्वेष भावनेचे राजकारण या आमच्या पूर्वजांनी कधीच केले नाही. संस्थात्मक काम करताना त्यांच्याप्रमाणेच आपण सर्व सहका//र्‍यांना सोबत घेऊन, सगळ्या समाजघटकांच्या सहभागातून तालुक्यात परिवर्तन घडविण्यासाठी आपली उमेदवारी असल्याची ग्वाही काडादी यांनी दिली.
ज्येष्ठ नेते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते-पाटील आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासोबत तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळींची आपल्याला साथ आहे. आपल्या उमेदवारीला माजी आमदार दिलीपराव माने यांनीही पाठिंबा दिला आहे. दक्षिण सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेची ही लढाई आहे. ही लढाई तडीस नेण्यासाठी आपल्याला विजयी करण्याचे आवाहन काडादी यांनी केले.


महालिंगराया यांच्या पालखीचे दर्शन
औराद येथे माजी सभापती अशोक देवकते यांच्या निवासस्थानी धर्मराज काडादी यांच्या प्रचारासाठी बैठक सुरू असतानाच ग्रामदैवत महालिंगराया यांच्या पालखीचे आगमन झाले. हा शुभसंकेत असून काडादी यांच्या उमेदवारीला ईश्वरी अधिष्ठान असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी धर्मराज काडादी यांनी  पालखीचे पूजन करून श्रींचे मनोभावे दर्शन घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments