करजगीत, सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ झाली कॉर्नर बैठक
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट मतदारसंघातील करजगी येथे सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ बैठक घेतली गेली. गावाची प्रगती होण्यासाठी जी विकासकामे गावामध्ये केली त्याबद्दल गावकऱ्यांना माहिती देऊन भाजप-महायुतीला मतदान करावे अशी विनंती केली.
करजगी गावात मुस्लिम समाज वस्ती वीरभद्रेश्वर मंदिर श्री विनायक गणेश मंदिरासमोर सभामंडप बांधकाम, बेडर वस्ती, ढोर वस्ती, चांभार वस्ती, राजीव गांधी नगर येथे सिमेंट रस्ता, तेने प्पा फुलारी घर ते ओढ्यापर्यंत बंदिस्त गटार, अंगणवाडी क्र. 121 दुरूस्ती, इरण्णा सुतार शेत ते किरण खसकी शेतापर्यंत पाणंद रस्ता, मुळजे शेतापासून ते धुबधुबी सोनकांबळे शेतापर्यंत रस्ता, लिंगायत स्मशानभूमी ते तळवळ रस्त्यापर्यंत पाणंद रस्ता,कणबस- करजगी- घुंगरेगांव रस्ता, सुलेरजवळगे ते करजगी मध्ये रस्ता सुधारणा अशी कामे झाली आहेत. त्याचप्रमाणे भावसार समाजवस्ती व मल्लिकार्जुन मंदिर येथे सभामंडप बांधकाम, अमोगी बिरू पाटील शेत ते गैवडनुरू शेतापर्यंत पाणंद रस्ता, अंगणवाडी दुरुस्ती, तडवळ- कोसेगाव रस्ता सुधारणा, करजगी ते हंद्राळ रस्ता सुधारणा या कामांना मंजुरी मिळालेली आहे.
यावेळी Adv. दयानंद उंबरजे , विवेकानंद उंबरजे, परमेश्वर यादवाड, सतीश काळे, विलास गव्हाणे, दिलीप भाऊ सिद्धे, संजय अण्णा देशमुख, अविनाश मडीखांबे, शिवराज स्वामी, महादेव मुडवे, शिवपुत्र बुक्कानुरे, सागर हिप्पर्गी, मन्सूर अत्तार, शब्बीर पटेल, बसवराज सावळी, दस्तगीर गोडीकट, अ कादर गोडीकट, सौ. चंद्रकला करीमुंगी,यांच्यासह भाजप-महायुतीसह मित्र पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments