मंद्रूप येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष सेवू पवार यांची
सभा उत्साहात पार पडली
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-२५१, सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष सेवू पवार यांच्या नेतृत्वाखाली मंद्रूप येथे आयोजित कॉर्नर सभेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संतोष पवार यांनी आपल्या भाषणात तालुक्यातील प्रलंबित समस्यांवर थेट आक्रमण केले आणि जनतेला बदलाची हाक दिली.
सभेमध्ये पवार यांनी आजवर तालुक्यातील जनतेला विकासाच्या नावाखाली फसविणाऱ्या धनदांडग्या व प्रस्थापित नेत्यांवर कडाडून टीका केली. तालुक्यातील सिंचनाच्या रखडलेल्या प्रकल्पांपासून बेरोजगारीच्या समस्येपर्यंत, तसेच MIDC च्या उभारणीतील अपयश आणि जाती-धर्माच्या आधारावर खेळले जाणारे राजकारण यांवर त्यांनी परखड भाष्य केले. "आम्ही तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत. आजवर जनतेला दिलेली खोटी आश्वासने आता चालणार नाहीत. तालुक्याला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी आणि प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी या वेळी परिवर्तन हवे आहे," असे पवार यांनी ठामपणे सांगितले.
स्वार्थी राजकारण्यांना यंदा धडा शिकवण्यासाठी आपल्या मतदानाचा योग्य वापर करा आणि तालुक्यात सकारात्मक बदल घडवून आणा असं आव्हान संतोष पवार यांनी तालुक्यातील जनतेला आवाहन केले.याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी व मार्ग फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments