घरोघरी भेटीगाठी करत फारूक शाब्दीनीं मतदारांशी साधला संवाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 8, 2024

घरोघरी भेटीगाठी करत फारूक शाब्दीनीं मतदारांशी साधला संवाद

  घरोघरी भेटीगाठी करत फारूक शाब्दीनीं मतदारांशी साधला संवाद


सोलापूर(कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात एम.आय.एम चे उमेदवार फारूक शाब्दी यांनी पुढाकार घेतला असून डोअर टू डोअर भेटीगाठी करत मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात झाले.

 शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील यतीम खाना परिसर, थोबाडे वस्ती परिसर, रामवाडी परिसर , लिंबेवाडी परिसर, भैरुवस्ती, इरण्णा वस्ती, गरीबी हटाव झोपडपट्टी, रेवणसिद्वेश्वर मंदिर, जुना विजापूर नाका आणि अबू हनीफा मस्जिद या ठिकाणी कॉर्नर बैठका घेतल्या.

घरोघरी भेटीगाठी करत प्रचारातून मतदारांशी संवाद साधला. एमआयएम चे सर्व कार्यकर्ते आणि सर्व समाजातील मतदारांनी फारूक शाब्दी सोबत सहभाग घेतला होता. फारूक शाब्दी यांनी मतदारांशी संवाद साधल्यामुळे एमआयएमची एक वेगळी सर्वधर्म समभाव असल्याची छाप पडली आहे. सततच्या संवादामुळे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शाब्दीमय वातावरण झालेले दिसत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages