युवराज राठोड यांनी प्रचाराचा जोरदार शुभारंभ केला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 8, 2024

युवराज राठोड यांनी प्रचाराचा जोरदार शुभारंभ केला

 युवराज राठोड यांनी  प्रचाराचा जोरदार शुभारंभ केला

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीचे निमंत्रक तथा उमेदवार युवराज राठोड यांनी गुरुवारी आपल्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ केला त्यांनी आपल्या प्रचाराचा झंझावात दक्षिण मध्ये सुरू केला आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात बंजारा समाजाची सुमारे 40 ते 50 हजार मतदान आहे. 

या मतदारसंघात बंजारा, धनगर, मुस्लिम, लिंगायत, माळी, साळी आणि कोळी असे ओबीसी प्रवर्गात मोडणारे समाज आहेत. या ओबीसींचा चेहरा म्हणून युवराज राठोड हे मतदारांसमोर जात आहेत.

शुक्रवारी प्रचारादरम्यान युवराज राठोड यांनी मंद्रूप येथील सेवालाल नगर तांडा येथे गाठीभेटी घेतल्या. यावेळी मंद्रूप सेवालाल नगर तांडा येथील अविनाश पवार, अमोल राठोड सावकार, प्रकाश राठोड, किरण चव्हाण, संजय पवार, मोहन पवार, धर्मा चव्हाण, नितीन चव्हाण, शिरजित राठोड, योगेश्वर पवार या बंजारा समाज बांधवांनी एकमुखी पाठिंबा जाहीर केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages