अनिल सावंत यांच्यासाठी शरद पवार मतदारसंघात घेणार दोन सभा; कामाला लागण्याचे पवार साहेबांचे आदेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 4, 2024

अनिल सावंत यांच्यासाठी शरद पवार मतदारसंघात घेणार दोन सभा; कामाला लागण्याचे पवार साहेबांचे आदेश

 अनिल सावंत यांच्यासाठी शरद पवार मतदारसंघात घेणार दोन सभा; कामाला लागण्याचे पवार साहेबांचे आदेश



मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात कसल्याही परिस्थितीत माघार न घेता अनिल सावंत हे आपले अधिकृत उमेदवार आहे आणि त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे.
पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यात मी दोन सभा घेणार आहे. सभेच्या तारखा लवकरच तुम्हाला सांगितले जाणार असल्याचेही यावेळी भेटीदरम्यान खासदार शरद पवार यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील भेटीसाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला केले असल्याची माहिती शरद पवार पक्ष राष्ट्रवादीचे मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी यांनी दिली आहे.
आज पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील दोन्ही तालुक्याचे राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ खासदार शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. यामध्ये दोन्ही तालुक्यातील राष्ट्रवादीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. तूतारीचा एबी फॉर्म अनिल सावंत यांना मिळाला आहे. यासंदर्भात दोन्ही तालुक्यातील राष्ट्रवादीचे शिष्ट मंडळ खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते.
यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघातील संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट सांगितला असल्याची माहिती मिळत आहे. आणि यानुसार दोन्ही शहर व ग्रामीण भागात सध्या तुतारीची हवा असल्याची माहिती दिली आहे.
यानंतर शिष्टमंडळाने आपला मोर्चा अकलूज कडे वळविला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे सोबत देखील चर्चा केली. यावेळी मोहिते पाटील यांनी अनिल सावंत यांच्या विजयासाठी कामाला लागण्याची आदेश दिले आहेत.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांतिक सदस्य राहुल शहा, कार्याध्यक्ष संतोष रंदवे, विशाल खटकाळे, पंढरपूर तालुका अध्यक्ष संदीप मांडवे, शहराध्यक्ष सुभाष भोसले, दत्ता पाटील, माणिक गुंगे,
आंधळगावचे सरपंच लहुजी लेंडवे, बंडू पाटील, नवनाथ यादव, आप्पासाहेब माने सरकार, सलगर चे बंडु जाधव, अमर सोमगुंडे, सागर गुरव, पंडित गवळी, बबन ढावरे, सुभाष सुडके, नाना करपे, काशिनाथ पाटील,गुरय्या स्वामी, सिताराम भगरे, काशिनाथ सावजी, दादा भगरे, इसाक शेख, फिरोज मुलाणी,मुझफ्फर काझी, बापू वस्त्रे, संतोष नागणे आदी उपस्थित होते


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages