सुभाष देशमुखांसाठी जुळली पॉझिटिव्ह समीकरणे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला निगेटिव्ह वातावरण दिसून आले. तेच वातावरण विधानसभा निवडणुकीतही राहील अशा चर्चा ऐकण्यास मिळाल्या.
एकीकडे असे असताना दुसरीकडे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्यासाठी पॉझिटिव्ह समीकरणे जुळून आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशमुख हे महाविकास आघाडीतील बिघाडी पाहता लकी मानले जात आहेत. दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना दहा हजाराचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निश्चित विजयी होईल असे बोलले गेले. पण या मतदारसंघातून इच्छुक असलेले माजी आमदार दिलीप माने, दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, माजी स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्री, महादेव कोगनुरे हे प्रमुख नेते इच्छुक होते. त्यानंतर दक्षिणचे राजकारणात धर्मराज काडादी यांची एन्ट्री झाली. त्यामुळे सगळी समीकरणे बिघडली. या सर्व गोंधळात महाविकास आघाडी मधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली
0 Comments