Hot Posts

6/recent/ticker-posts

बेवारस मयताबाबत आवाहन

बेवारस मयताबाबत आवाहन

   पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर रेल्वे स्टेशन हद्दीत दि 30 ऑक्टोबर  2024 रोजी  एक अनोखळी व्यक्ती कोणत्या तरी रेल्वे गाडीतून पडून जागीच मयत झाली आहे . सदर मयत व्यक्तीबाबत माहिती असल्यास सबंधितांनी रेल्वे पोलीसांशी संपर्क साधवा असे , आवाहन पंढरपूर रेल्वे पोलीसांनी केले आहे .

       या अनोळखी मयत व्यक्तीचे वय अंदाजे 45 वर्षे असून , उंची 5.5 इंच , वर्ण गोरा , अंगाने सडपातळ बांधा , डोक्याचे केस वाढलेले काळे-पांढरे,  नाक सरळ, चेहरा उभट, अंगात लाल  रंगाचा चौखडा शर्ट , पांढरट क्रिम कलरची  पॅन्ट असे मयत व्यक्तीचे वर्णन आहे .

संबधीतांनी तसेच ओळखीच्या व्यक्तीने याबाबत पंढरपूर लोहमार्ग पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे 

Reactions

Post a Comment

0 Comments