जिल्ह्यातील 198 गावांना 229 टँकरद्वारे पाणीपुरवठा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 17, 2026

जिल्ह्यातील 198 गावांना 229 टँकरद्वारे पाणीपुरवठा

    जिल्ह्यातील 198 गावांना 229 टँकरद्वारे पाणीपुरवठा

 

               सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- : सोलापूर जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ दि. 16 नोव्हेंबर 2026 रोजी 229 गावे व 957 वाड्यांमधील 3 लाख 99 हजार 935 नागरिकांना व 1 लाख 95 हजार 297 पशुधनाला 229 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय 50 विहिरी व 32 बोअर असे एकूण 82 जलस्रोत अधिग्रहित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.डी. राठोड  यांनी दिली.
               तालुकानिहाय मंगळवेढा 45 गावे - 58 टँकर, सांगोला 39 गावे - 55 टँकर, अक्कलकोट 27 गावे - 17 टँकर, माढा 16 गावे - 22 टँकर, बार्शी 17 गावे - 7 टँकर, करमाळा 16 गावे - 15 टँकर, माळशिरस 11 गावे - 11 टँकर, उत्तर सोलापूर 9 गावे - 16 टँकर, दक्षिण सोलापूर 7 गावे - 10 टँकर, मोहोळ 10 गावे - 17 टँकर असून पंढरपूर 1 गाव व 1 टँकर.
 जिल्ह्यात टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages