राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेत 'मा.बबनरावजी शिंदे विद्यालचा डबल धमाका - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 17, 2026

राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेत 'मा.बबनरावजी शिंदे विद्यालचा डबल धमाका

 राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेत 'मा.बबनरावजी शिंदे विद्यालचा डबल धमाका

​टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):- त्यागराज स्टेडियम दिल्ली येथे राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये मा.बबनरावजी शिंदे विद्यालय अकोले खुर्द च्या रग्बी खेळाडूंनी राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करत क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन दाखवत कौतुकास्पद यश संपादन केले आहे.
१९ वर्ष वयोगटात कु.प्राजक्ता सर्जेराव सोलंकर हिने सुवर्णपदक  मिळविले तर 
१४ वर्ष वयोगटात कु.ईश्वरी योगेश फरतडे हिने कांस्यपदक मिळविले 
​विद्यालयातील खेळाडूंनी दाखवलेले नैपुण्य, चिकाटी आणि उत्कृष्ट संघभावन या मुळे यश संपादन केले.
 यशस्वी खेळाडूंना  विजयकुमार माने सर ,बिराजदार सर,जोतीराम श्रीराम सर ,ओंकार लोंढे  सर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल,
आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा करमाळा तालुक्याचे  मा.आमदार श्री.संजय मामा शिंदे तसेच प्रशालेचे प्राचार्य मा.राजेंद्र ठोंबरे सर 
स.रा.मोरे विद्यालय अकोले खुर्द च्या मुख्याध्यापिका सौ. सुरवसे मॅडम 
सोलापूर जिल्हा रग्बी असोसिएशन चे सहसचिव मा.संजय शिंदे सर तसेच संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून सर्व विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages