Hot Posts

6/recent/ticker-posts

भारताचा नकाअकलूज येथे मानवी साखळीद्वारेशा करून 100 टक्के मतदान करण्याचा संदेश

  भारताचा नकाअकलूज येथे मानवी साखळीद्वारेशा करून 100 टक्के मतदान करण्याचा संदेश



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  254- माळशिरस विधानसभा मतदारसंघ (अ.जा.) अंतर्गत मतदार जनजागृतीकरिता प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. त्याअंतर्गत दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी अकलूज नगर परिषद व जिल्हा परिषद शिक्षण विभाग मार्फत मानवी साखळीद्वारे भारत देशाचा नकाशा तयार करून शंभर टक्के मतदान करणे बाबत संदेश देण्यात आला. व जास्तीत जास्त मतदारांनी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले.


अकलूज नगरपरिषद कार्यालय समोरील प्रंगणामध्ये 30 बाय 30 फूट मापाचा भारत देशाचा नकाशा तयार करण्यात आला. याउपक्रमामध्ये अकलूज येथील अकलाई विद्यालय तसेच जैन महावीर मंदिर विद्यालय येथील सुमारे 200 विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक सहभागी झाले होते. सर्व विद्यार्थ्यांच्या मदतीने भारत देशाचा हुबेहूब नकाशा तयार करून मतदानाचा टक्का वाढविण्याकरिता सर्वांनी 100%  मतदान करणेबाबत आवाहन करण्यात आले . तसेच याद्वारे भारतातील सर्व नागरिक यांनी लोकशाही वर निष्ठा ठेवून आगामी विधानसभा निवडणुकीत निर्भयपणे कोणत्याही धर्म,वंशसमाजभाषा यांचे प्रभावाखाली न येता तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करणेबाबतही आवाहन करण्यात आले.

        या उपक्रमामध्ये स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्याधिकारी अकलूज नगरपरिषद दयानंद गोरे,  जि. प. शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख प्रभाकर विठ्ठल ननवरे व  मुख्याध्यापक उमा जाधवमुख्याध्यापक पठाण पी. ए.राजश्री खरातदत्तात्रय गायकवाड ,अनुपमा वसेकरप्रदीप सातपुतेहमीद मुलाणीउमेश फलटणकरसंतोष यादवस्वीप सहाय्यक नोडल पवन भानवसेस्वीप सहाय्यक नोडल सुनील काशीदसाहाय्यक निरिक्षक धोंडीराम भगनुरे व इतर नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप चे जिल्हास्तरीय नोडल अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर व ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा नोडल अधिकारी  सुधीर ठोंबरे हे जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात स्वीप अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे विविध जनजागृतीपर उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या उपक्रमांना जिल्ह्यातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments