भोसरी मतदारसंघाला आदर्श मॉडेल करण्याचे आमदार लांडगे यांचे प्रयत्न - कर्नाटकचे माजी मंत्री प्रभू चव्हाण
पिंपरी, पुणे ( कटूसत्य वृत्त ) :- भोसरी विधानसभा मतदारसंघात दहा वर्षे आमदार म्हणून काम केलेले महेशदादा लांडगे हे मतदारसंघाला आदर्श मॉडेल बनविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पहिले संविधान भवन बांधून भाजपने आपण संविधान समर्थक आहोत हे दाखवून दिले आहे. मोशी येथील सफारी पार्क, छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा स्मारक, मोशी येथे साडेआठशे बेड्सचे नियोजित रुग्णालय, आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र, चिखली येथील संत पीठ असा कामांचा डोंगर आमदार महेश लांडगे यांनी उभा केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात आमदार लांडगे यांचा विजय निश्चित आहे असे प्रतिपादन कर्नाटक माजी मंत्री आणि औराद चे आमदार प्रभू बी. चव्हाण यांनी केले.
भोसरी येथे आयोजित बिदर-कलबुर्गी वासीयांच्या स्नेहसंमेलनात आमदार चव्हाण बोलत होते. यावेळी भाजप महायुतीचे उमेदवार महेश लांडगे, बसवकल्याणचे आमदार शरणू सलगर, समन्वयक विजय फुगे, नगरसेवक संतोष लोंढे, नम्रता लोंढे, योगेश लोंढे, कामगार नेते मच्छिंद्र दरवडे, शिवराज आलमाजे, भरत कदम, राहुल पाटील, विष्णू मारुती, अमित राठोड, धनराज राठोड, मंजू स्वामी, वीरेंद्र राजापुरे, सचिन राठोड, शिवकुमार जुल्फे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज, शेतकऱ्यांना मोफत वीज अशा अनेक लोकहितवादी, शेतकरी हिताच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. हे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास या योजना पुन्हा अधिक गतिमानतेने राबविल्या जातील असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार चव्हाण म्हणाले की, महेशदादा लांडगे हे सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होऊन भोसरी मतदार संघ राज्यात प्रथम क्रमांकावरील विकसित मतदार संघ बनविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे जनहित दक्ष व्यक्ती आहेत. दोन दिवस मतदारसंघात फिरल्यानंतर सर्वत्र भाजपची लाट दिसून आली. महेश लांडगे हे एक लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यापूर्वी महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील सरकारने खोट्या गोष्टी खरे असल्याचे भासवले काँग्रेस हा देशविरोधी पक्षांना पाठिंबा देणारा पक्ष आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहणाऱ्या राहुल गांधींना जनतेचा फारसा पाठिंबा नाही. कर्नाटकातील काँग्रेस आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ बोर्डाची मालमत्ता करत आहे. देशभरात शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा उन्माद सुरू आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हा कायदा लागू करण्याचा प्रस्ताव भाजपने ठेवला आहे. भाजप हा जनतेचे कल्याण करणारा पक्ष असून चांगले काम करणाऱ्या महायुती सरकारला महाराष्ट्रातील जनता साथ देईल, असेही ते म्हणाले.
बसवकल्याणचे आमदार शरणू सलगर म्हणाले की, महायुतीचे सरकार महाराष्ट्रात सुशासन चालवत आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांचा विकासपुरुष असा उल्लेख केला. त्यांना पुन्हा विजयी करायचे आहे. हे लक्षात ठेवा असे त्यांनी सांगितले.
आमदार प्रभू चव्हाण यांनी मंगळवारी भोसरी विधानसभा मतदारसंघातील शांतीनगर, इंदिरानगर, वसाहती तांडा आसह अनेक ठिकाणी घरोघरी जाऊन पक्षीय पत्रके वाटून मतदारांना भाजपचे उमेदवार आमदार महेश दादा लांडगे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
0 Comments