शिक्षकांनी आपल्या ज्ञानाचे भांडार वाढवले पाहिजे-डॉ.गणपतराव मोरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 22, 2024

शिक्षकांनी आपल्या ज्ञानाचे भांडार वाढवले पाहिजे-डॉ.गणपतराव मोरे

 शिक्षकांनी आपल्या ज्ञानाचे भांडार वाढवले पाहिजे-डॉ.गणपतराव मोरे



बार्शी (कटूसत्य वृत्त):-  शिक्षक हा विद्यार्थ्यांचा गुरू आहे. वर्गावर जाताना शिक्षकांनी नेहमी तयारीने जावे, असे सांगून शिक्षकांनी आपल्या ज्ञानाचे भांडार वाढवले पाहिजे, असे मत लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांनी व्यक्त केले. येथील महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे गुणवंत शिक्षक गौरव सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर लातूरच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष सुधाकर तेलंग, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी. वाय. यादव, सचिव पी.टी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, संस्थेचे सहसचिव ए. पी. देबडवार,संस्थेचे खजिनदार जे. सी.शितोळे तसेच संस्था सदस्य सी. एस. मोरे, व्ही. एस. पाटील आदी उपस्थित होते.शिक्षक हा द्यार्थ्यांचा मार्गदर्शक मित्र असून शिक्षकाने अध्यापनामध्ये विविध पद्धतीचा वापर करावा, असे सुधाकर तेलंग म्हणाले.


यांचा झाला सन्मान 
या कार्यक्रमामध्ये विविध शाखांमधील शिक्षकांमधून संतोष माने (बाल संस्कार केंद्र, वाशी-प्राथमिक विभाग), समाधान बेदरे (कर्मवीर विद्यालय चारे-माध्यमिक विभाग), बळवंतराव शिवाजी, हनुमंत काळे, डॉ.संजय करंडे, डॉ. व्ही. पी.शिखरे, उत्कृष्ट मुख्याध्यापिका कविता धावणे, उत्कृष्ट प्राचार्य-डॉ. रत्नदीप सोनकांबळे (राजश्री शाहू लॉ कॉलेज, बार्शी), उत्कृष्ट शाखा पुरस्कार महाराष्ट्र विद्यालय बार्शी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी म्हणून अजित सुरवसे (कर्मवीर विद्यालय चारे) व विश्वास कदम ( श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी) या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्ष समारोप करताना डॉ. बी. वाय. यादव यांनी संस्थेतील सर्व शिक्षकांनी मुलांना ज्ञान देण्याबरोबरच संस्काराचे धडे दिले पाहिजे,असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे करताना संस्थेचे सचिव पी.टी. पाटील म्हणाले,प्रास्ताविक गेली ९० वर्षे या संस्थेचा विस्तार वाढवण्यामध्ये शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे.शिक्षक केवळ शिक्षकीपेशा करत नाही तर तो अनेक पिढ्या घडविण्याचे कार्य करत असतो.संस्थेचे खजिनदार जे.सी. शितोळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.किरण गाढवे व डॉ. आसावरी फरताडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सहसचिव ए.पी. देबडवार यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages