म्हणून 'लाडक्या बहिणीं'ना आधीच पाच हप्ते दिले, नंतर दोन हजार रुपये देणार: मुख्यमंत्री शिंदे
मुंबई (कटूसत्य वृत्त), मुक्ताईनगर (जि. जळगाव): लाडकी बहीण योजना कुठल्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आणि सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दीड हजारऐवजी दोन हजार रुपये मिळतील, असे आश्वासन दिले.
आपले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे मी सीएम नाही, तर कॉमन मॅन आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. राज्य सरकारने तीर्थयात्रेसारख्या विविध लोककल्याणकारी योजना सुरू केल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू आता सरकत चालली आहे, अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.

No comments:
Post a Comment