२० वर्षाच्या प्रदीर्घ देश सेवेनंतर जाधव हे सेवानिवृत्त झाले
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-२० वर्ष सीमा सुरक्षा बल येथे आपली प्रामाणिकपणे देशसेवा बजावल्यानंतर मेजर राहुल राजेंद्र जाधव हे सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त मु.पो. गलंदवाडी ( तालुका-मोहोळ) येथील नागरिकांनी मेजर जाधव यांचा भव्य नागरी सत्कार केला.२००४ साली सैन्यात भरती झालेले मेजर जाधव यांनी आजवर जम्मू काश्मीर, राजस्थान, पश्चिम बंगाल , ओडिसा , त्रिपुरा , गुजरात अशा दुर्गम ठिकाणी आपली देश सेवा इमाने इतबारे बजावली.सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ संपन्न झाला. मेजर जाधव यांचे वडील राजेंद्र जाधव व आई यांना नेहमी वाटायचे कि आपल्या मुलाने देशसेवेत कार्यरत होऊन आपले कर्तव्य बजावले पाहिजे , त्यांच्या विश्वासाला सत्यात उतरवीत त्यांचा मुलगा राहुल हा पहिल्याच प्रयत्नात देश सेवेत रुजू झाला. मेजर राहुल जाधव यांचे प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण हे केम येथे झाले. आपल्या गावासाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याने मेजर जाधव यांची ग्रामस्थांनी मोटरसायकल वरून रॅली काढत त्यांच्या कर्तव्याला सलाम केला.
.png)
No comments:
Post a Comment