नितेश राणे यांच्याविरोधात माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना ठाकरेंनी रिंगणात उतरविले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, October 27, 2024

नितेश राणे यांच्याविरोधात माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना ठाकरेंनी रिंगणात उतरविले

नितेश राणे यांच्याविरोधात माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना ठाकरेंनी रिंगणात उतरविले 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उद्धव ठाकरे शिवसेना गटाने आज १५ मतदारसंघातील दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनिल गोटे, अजय चौधरी यांच्या उमेदवारीचा समावेश आहे. याचबरोबर ठाकरे गटाने कट्टर विरोधी नितेश राणे यांच्या विरोधातही उमेदवार उतरविला आहे.

कणकवली मतदारसंघातून नितेश राणे यांच्याविरोधात माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना ठाकरेंनी रिंगणात उतरविले आहे. २०१४ मध्ये जेव्हा नितेश राणे पहिल्यांदा निवडणूक लढवत होते तेव्हा संदेश पारकर हे राणेंसोबत प्रचार करत होते. पारकर यांनी नितेश राणेंना गावागावातील विखुरलेल्या प्रत्येक घरापर्यंत चिखलातून पायी चालत नेत पोहोचविले होते. आता याच नेत्याला ठाकरेंनी नितेश राणेंविरोधात उभे केले आहे. संदेश पारकर आणि राणे कुटुंबियांचे वैरही आहे. राष्ट्रवादीचे नेते सत्यविजय भिसे हत्या प्रकरणानंतर नारायण राणे विरोधी पक्ष नेते असताना राणेंचा बंगला जाळण्यात आला होता. तेव्हा संदेश पारकर राष्ट्रवादीत होते व नगराध्यक्ष होते. नंतरच्या राजकीय परिस्थितीत राणे-पारकर एकत्र आले होते. यानंतर पुन्हा राणे-पारकर यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आणि ते पुन्हा विरोधी बनले.

याचबरोबर ठाकरेंनी शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्याविरुद्ध भायखळ्यातून मनोज जामसुतकर यांना उमेदवार केले आहे. धुळे शहरातूनअनिल गोटेंना उमेदवारी देण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages