यशवंत माने यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार -गाढवे बंधू
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी चालू झाली आहे. राज्यात शरद पवार यांच्या गटात येण्याची संख्या जास्त आहे. परंतु याला अपवाद मोहोळ विधानसभा मतदारसंघ ठरला असून, विद्यमान आमदार यशवंत माने यांना मतदार संघात मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांची मतदारसंघात ताकद वाढताना दिसत आहे.
मोहोळ (गाढवे वस्ती) येथील युवा उद्योजक प्रशांत गाढवे व सुनील गाढवे यांचा त्यांच्या शेकडो समर्थकांसह सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन यांच्या नेतृत्वखाली आमदार यशवंत माने लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विद्यमान आमदार यशवंत माने यांचे यामुळे मोहोळ शहरात आणखी वजन वाढले असूनयुवा उद्योजक असणारे गाढवे बंधू यांच्या पाठीशी अनेक समाजबांधव युवक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही मोठ्या ताकतीने काम करणार असून यशवंत माने यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार राजन पाटील बाळराजे पाटील यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही इथून पुढे लोकनेते परिवारात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोहोळ येथून मोठी रॅली काढून, त्यांनी अनगर येथे येऊन लोकनेते परिवारात प्रवेश केला. हा प्रवेश केल्याबद्दल माजी आमदार राजन पाटील व यशवंत माने यांनी त्यांचे स्वागत करून येणाऱ्या काळात तुमच्या पाठीशी खंबीर उभे राहू अशी खात्री दिली
0 Comments