Hot Posts

6/recent/ticker-posts

शहरस्तरीय मैदानी स्पर्धेत एस.एस. स्पोर्ट्स अकॅडमीला 43 पदके

 शहरस्तरीय मैदानी स्पर्धेत

 एस.एस. स्पोर्ट्स अकॅडमीला 43 पदके

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-एस.आर.पी.एफ. मैदान सोरेगाव येथे दिनांक 6 ते 8 ऑक्टोबर 2024 या कालावधीत शहरस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते...

 या स्पर्धेत नेहरूनगर येथील एस.एस. स्पोर्ट्स अकॅडमीने एकूण 43 पदकांची कमाई करून घवघवीत यश मिळविले ... आतापर्यंतच्या सर्वाधिक पदकांची कमाई या अकॅडमीने केलेली आहे... यात एकूण 25 सुवर्ण पदके, 9 रौप्य पदके व 9 कांस्य पदकांचा समावेश आहे... या सर्व यशस्वी खेळाडूंना महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक असोसिएशनचे उपाध्यक्ष मा.राजू प्याटी , कबड्डी राज्य पंच मा.सुभाष माने, रेल्वे अधिकारी मा.निलेश वरवडकर आदी मान्यवरांनी अभिनंदन केले... या सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक एन.आय.एस.कोच मा.सूर्याजी लिंगडे व एन.आय.एस. कोच मा.भारती लिंगडे यांचे मार्गदर्शन लाभले...

 # निकाल पुढीलप्रमाणे : 

 #14 वर्षाखालील मुले : 

देवांश जाधव 100 मीटर धावणे (रौप्य),  यश वानखेडे थाळीफेक (सुवर्ण)

 # 14 वर्षाखालील मुली

 सृष्टी लिंगडे 80 मीटर अडथळ्याची शर्यत (सुवर्ण) 100 मीटर धावणे (रौप्य) व लांब उडी (कांस्य)

 # 17 वर्षाखालील मुले

 यशवर्धन लिंगडे 110 मीटर अडथळ्याची शर्यत (सुवर्ण), 400 मीटर अडथळ्याची शर्यत (सुवर्ण)

 4 x 100 रिले (कांस्य), ओम वाघमारे - भालाफेक (रौप्य), श्लोक स्वामी - तिहेरी उडी (सुवर्ण), 400 मीटर धावणे (कांस्य), सुधीर कोलकुरे 200 मीटर धावणे (कांस्य), 4 x 100 रिले (कांस्य), ईशान पटणे 4 x 100 (कांस्य),  श्रवण जाधव 4 x 100 रिले (कांस्य)

 # 17 वर्षाखालील मुली

 भक्ती थोरात - लांब उडी (सुवर्ण), 100 मीटर अडथळ्याची शर्यत (सुवर्ण), 400 मीटर अडथळ्याची शर्यत (सुवर्ण),  अस्मिता बिराजदार -  तिहेरी उडी (सुवर्ण),  400 मी. अडथळ्याची शर्यत (रौप्य), लांब उडी (कांस्य), कृषी बनसोडे 100 मीटर धावणे (कांस्य), 200 मीटर धावणे (कांस्य),  सृष्टी गणगे - गोळा फेक (सुवर्ण), अनुजा पांढरे - गोळा फेक (रौप्य), थाळीफेक (रौप्य), आदिती सपकाळ - 100 मीटर धावणे (सुवर्ण),  200 मीटर धावणे (सुवर्ण), स्वराज जाधव - 400 मीटर धावणे (सुवर्ण), 800 मीटर धावणे (रौप्य)

 # 19 वर्षाखालील मुले

 अरुल माने - 100 मीटर धावणे (सुवर्ण), 200 मीटर धावणे (रौप्य) थाळीफेक (सुवर्ण ), ओम वरवडकर 200 मीटर धावणे (सुवर्ण),  400 मीटर धावणे (सुवर्ण) 4x100 रिले (सुवर्ण), सचिन मायनाळे 4 x 400  रिले (सुवर्ण), 110 मीटर अडथळ्याची शर्यत (सुवर्ण),  लांब उडी (सुवर्ण),  विश्वराज बिराजदार गोळा फेक (सुवर्ण ) 

 # 19 वर्षाखालील मुली 

पूजा राठोड - 100 मीटर धावणे (सुवर्ण), 200 मीटर धावणे (सुवर्ण) 4x100 रिले (सुवर्ण), शरयू क्षीरसागर 100 मीटर धावणे (रौप्य)

 अहमदनगर येथे होणाऱ्या पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी सुवर्ण व रोपे पदक प्राप्त खेळाडूंची निवड झाली आहे...

Reactions

Post a Comment

0 Comments