Hot Posts

6/recent/ticker-posts

एस व्ही सी एस च्या दोन विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

 एस व्ही सी एस च्या दोन विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड 



सोलापूर(कटूसत्य वृत्त):- राजीव गांधी इनडोअर स्टेडियम येथे झालेल्या १९ वर्षे वयोगट मुली कॅरम स्पर्धेत एस व्ही सी एस हायस्कूल एमआयडीसीची राणी काळे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून यश मिळविले असून तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे व एस आर पी कॅम्प सोरेगाव येथे झालेल्या १७ वर्षे वयोगट मुले शहर जिल्हास्तरीय उंच उडी स्पर्धेत सिद्धाराम मरबगी यानेही प्रथम क्रमांक पटकावला असून त्याचीही विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले आहे या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक हनुमंत येळमेली यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक      सगंप्पा म्हमाणे , उपमुख्याध्यापक धनंजय नकाते व पर्यवेक्षक संतोष कुमार तारके यांनी अभिनंदन व सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments