अरविंद धाम ते देगाव, सीएनएस हॉस्पिटल पर्यंतचा 54 मिनिटात रस्ता पूर्ण होणार.
सोलापूरकरांची वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात सुटका.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-शहरातील शाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील रेल्वे पूल ,ज्याचे आयुर्मान संपलेले आहे, दिवाळीनंतर तो पूल रेल्वे प्रशासन काढून टाकणार आहे .अशा परिस्थितीत दमाणी नगर, इंद्रधनु, देगाव, मंगळवेढा ,सांगोला, सांगली मार्गे कोल्हापूर आणि पुढे जाणाऱ्या वाहनांची प्रचंड गैरसोय होणार होती, त्याला पर्याय म्हणून छत्रपती धर्मवीर संभाजी राजे चौक, जुना पुणे नाका, अवंती नगर, अरविंद धाम ते देशमुख पाटील वस्ती, देगाव सीएनएस हॉस्पिटल ,आणि पुढे सोरेगाव पर्यंतचा नवीन प्रस्तावित 54 मीटर बायपास रस्ता गेली अनेक वर्षे पेंडिंग आहे.
रेल्वे पुलाचे कधीही पाडकाम केले जाऊ शकते, यासाठी सोलापूर विकास मंच गेले तीन वर्षे सातत्याने हा बायपास 54 मीटर रस्ता तातडीने पूर्ण करावा यासाठी मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त ,उपायुक्त, शहर अभियंता व रेल्वे अधिकारी, डी आर एम साहेब यांच्याशी सातत्याने अनेक बैठका घेतल्या. अनेक पालकमंत्री होऊन गेले, त्या प्रत्येकासमोर हा विषय सोलापूर विकास मंच मांडतच होता .
विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे तीन वेळा हा विषय सोलापूर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी समक्ष भेटून त्याचे महत्त्व पटवून दिले.जुना पुणे नाका, अरविंद धाम, देशमुख पाटील वस्ती ते देगाव सीएनएस हॉस्पिटल पर्यंत हा निम्मा भाग पूर्ण होण्यासाठी महानगरपालिकेला तीन कोटी रुपयांची गरज होती. त्यासाठी सोलापूर विकास मंचने विविध पातळीवर, मंत्रालय पातळीवर अनेक प्रयत्न करून पैशाची मागणी केली .आत्ताच अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाने या 54 मीटर रस्त्यासाठी चार कोटी बारा लाख रुपये मंजूर केलेले आहेत.
रेल्वेचा पूल पाडे पर्यंत किमान निम्मा रस्ता तरी पूर्ण होईल अशी आशा करूयात. सोलापूर विकास मंचच्या प्रयत्नांना मिळालेले हे फार मोठे यश मानावे लागेल.इतक्या वर्षात एकाही आमदार, खासदार, नगरसेवक यांना सदरच्या रस्त्याचे महत्त्व पटले नव्हते. आज सुद्धा कुणीही या रस्त्याच्या बाबतीत आग्रही नाही ही खेदाची बाब म्हणावी लागेल.सोलापूर विकास मंच ने मात्र हा विषय सातत्याने लावून धरून तडीस नेलेला आहे. सोलापूरकरांची वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात सुटका होईल अशी अशा व्यक्त करूयात.
विद्यमान सरकारने जाताजाता सोलापूरचे महत्त्वाचे काम केल्याबद्दल पालकमंत्री महोदयांचे आभार तसेच या प्रदीर्घ मोहिमेचे श्रेय सोलापूर विकास मंच चे मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, केतन शहा, विजय जाधव, दत्तात्रेय अंबुरे, सुहास भोसले, मनोज क्षीरसागर, आंनद पाटील, या सर्व मंडळी व सोलापूर विकास मंच च्या सदस्यांना जाते.
0 Comments