उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी युवती अध्यक्ष किरण माशाळकर व युवक अध्यक्ष सुहास कदम यांचा कामाचा केला कौतुक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी व युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने सोलापूर शहरात सहा कॉलेज मध्ये युवक युवती संवाद कार्यक्रम राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर व युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी आयोजित केला होता. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर विश्रामगृह येथे युवक युवती संवाद च्या कार्यक्रमाबद्दल अजित दादांना कार्य अहवाल दाखवल्यानंतर राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर व युवक अध्यक्ष सुहास कदम यांचे कामाचे कौतुक उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोलापूर शहरात युवक युवती असंच काम करत राहा असं अजित दादा यांनी किरण माशाळकर व सुहास कदम यांना म्हणाले.
0 Comments