Hot Posts

6/recent/ticker-posts

सहायक पोलिस आयुक्त प्रिती टिपरे यांच्यावर शिस्तभंग तथा विभागीय चौकशी करण्याचे आदेश

सहायक पोलिस आयुक्त प्रिती टिपरे यांच्यावर शिस्तभंग तथा विभागीय चौकशी करण्याचे आदेश 

सोलापूर. (कटूसत्य वृत्त):-शहरातील सहायक पोलिस आयुक्त प्रिती टिपरे यांच्यावर शिस्तभंग तथा विभागीय चौकशी करण्याचे आदेश राज्य माहिती आयोगास सादर करण्याचे आदेश राज्य माहिती आयुक्त खंडपीठ पुणे यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले आहेत.दिनेशसिंग शितल व द्रोपतीबाई शितल यांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयकार्यालय येथील तत्कालीन अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शितल कुटुंबियांची फसवणुक करून अत्याचार केल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे अर्ज दिले होते. या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने शितल यांनी ७ मुद्दयांवर शहर पोलिसांकडे माहिती विचारली होती. त्यावेळी तत्कालीन जनमाहिती अधिकारी टिपरे यांनी माहिती नाकारली होती. त्यावेळी आयोगाने लेखी खुलासा मागततात्काळ माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी टिपरे यांनी एका वेळी एकाच विषयावर माहितीची मागणी करावी, अनेक विषयावर माहिती हवी असल्यास प्रत्येक विषयासाठी वेगळा अर्ज करावा असे अनावधानाने नमूद झाले आहे, असे प्रथम अपिलीय अधिकारी यांना समक्ष भेटून याबाबत अवगत केले होते. तरी या खुलाशाचा विचार करून एक वेळ क्षमापित करून खुलासा मान्य करावा अशी आयोगाला विनंती केली होती. त्यावर पुणे खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त करीत हा आदेश दिला.
Reactions

Post a Comment

0 Comments