३५० वर्षे होऊनही हा पुल एकही "चिरा न ढासळता शाबूत आहे. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 28, 2024

३५० वर्षे होऊनही हा पुल एकही "चिरा न ढासळता शाबूत आहे.

 ३५० वर्षे होऊनही हा पुल एकही "चिरा न ढासळता शाबूत आहे.

प्रतापगडाच्या पायथ्याशी "पार्वतीपुर" नावाचे एक गाव आहे. नंतर त्याचे "पार"असे नाव पडले. या पार गावाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक पुल बांधून घेतला होता.८ मीटर रुंदीचा हा पुल बहुधा प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात म्हणजे १६५६-१६५८ या दरम्यान बांधला गेला असावा.
कोयना नदी ओलांडण्या साठी ५२ मीटर लांब आणि ८ मीटर रुंद असा हा भक्कम दगडी पुल आहे. पुलाला असणाऱ्या पाच अधारांवर सुमारे साडेतीनशे वर्षां नंतरही हा पुल अद्यापही एकही चिरा न ढासळता शाबूत आहे. दगडांच्या फटीमध्ये साधे झाडही उगवलेले नाही. पुलाच्या दोन्ही बाजूंना हातभार उंचीचा १ फूटी दगडी कठडा आहे.या पुलाला ३५० वर्षे होऊनही अद्याप एकही तडा गेला नाही अथवा दगडही निसटला नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages