Hot Posts

6/recent/ticker-posts

शासकीय योजनांची माहीती आणि आपल्या समस्याचे निवारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व्हाट्सअप हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे...

 शासकीय योजनांची माहीती आणि आपल्या समस्याचे  निवारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व्हाट्सअप हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे...

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याची लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आदेशान्वये राज्यातील विविध शासकीय योजनांची माहीती सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांना सहाय्य करण्यासाठी तसेच जनसामान्यांच्या समस्येचे निराकरणासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महा राष्ट्रवादी  व्हाट्सअप हेल्पलाइन नंबर 9861717171 प्रत्यक्षात अमलात आणला असून याचा प्रचार व प्रसार स्थानिक पातळीवर व्हावा आणि जनसामान्यांना त्याचा लाभ घेता यावा उद्देशाने सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूरकरांनी कोणतीही माहीती हवी असल्यास किवा आपली समस्या थेट व्हाट्सअप च्या माध्यमातून नोंदवावी 

ह्या हेल्पलाइन वर महा राष्ट्रवादीची टीम सतत लक्ष ठेवून निरीक्षण करत आहेत आपल्या प्रश्नाला तात्काळ रिप्लाय देण्यासाठीच कटिबद्ध आहेत

ही हेल्पलाइन वापरताना 

👇खालील टीप्स फॉलो करा👇

1) वरती दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअँप करा...

2)त्यानंतर तुमची भाषा ,जिल्हा ,

मतदारसंघ , लिंग ई.गोष्टी निवडा...

३) ज्या योजनेची माहिती हवी असेल ती योजना निवडा 

४)योजनेबद्दल समस्या असल्यास ' मदत ' हा पर्याय निवडा

५) स्मस्येनुसार पर्यायाची पुष्टी करा 

६)यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल

७) यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याशी संपर्क साधेल .. 

यासाठी आमचा हेल्पलाइन व्हाट्सअप क्रमांक ९८६१७१७१७१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार जुबेर भाई बागवान यांच्या वतीने करण्यात आल आहे. 

या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर,कार्याध्यक्ष चित्रा कदम , शहर उत्तर विधानसभा संघटक प्रकाश झाडबुके , सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे , कांचन पवार,सुरेखा घाडगे यांची उपस्थिती होती...


Reactions

Post a Comment

0 Comments