डॉ. तुकाराम म्हमाणे सेट परीक्षा उत्तीर्ण
अनगर,(कटूसत्यवृत्त):-बाबूराव पाटील कला व शास्त्र महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे प्रा. डॉ. तुकाराम म्हमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आयोजित २०२४ रसायनशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. यापूर्वी त्यांनी रसायनशास्त्र विषयात सीएसआयआर-आयआयसीटी हैदराबाद येथे केंद्र शासनाची फेलोशीप मिळवून पीएच. डी. संपादन केली. तसेच ते नेट जेआरएफ ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. ते शेतकरी कुटुंबातील असून, मुळचे वडाचीवाडी (ता. मोहोळ) गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या या माजी आमदार राजन पाटील, संस्थाध्यक्ष विक्रांत पाटील, सचिव तथा सिनेट अजिंक्यराणा पाटील, सदस्य संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत सुर्यवंशी, सचिव गणेश पावले विविध शाखेचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
0 Comments