ग्रंथपाल अविनाश कावळे यांची
रायपूर येथील प्रशिक्षणासाठी निवड
कारी (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय ग्रंथालय मिशन भारत सरकार तर्फे क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील दि१० ते १४ ऑगस्ट दरम्यान रायपुर (छत्तीसगढ) येथे आयोजित प्रशिक्षणासाठी, तालुक्यातील कारी येथील ज्ञानोपासना सार्वजनिक वाचनालय येथील ग्रंथपाल अविनाश शंकर कावळे यांची निवड झाली आहे.
ग्रंथालय संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई, सहाय्यक ग्रंथालय संचालक पुडे व मा-जिल्हा ग्रंथालय अनधिकारी सोलापूर यांनी निवड केली आहे. यामुळे भारतीय आझाद कामगार महासंघाने कावळे यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी सी.बी. गंभीर, रजनी गंभीर, बी. आर. देशमुख, प्रदीप कांदे, कांदे, धनराज उपळाईकर, अभिजीत येडवे , महेश वाघे आदींनी ग्रंथपाल कावळे यांचे अभिनंदन केले.
0 Comments