नातेपुते येथे हिंदू खाटीक समाजाच्या वतीने अर्जुन खोतकर यांचा निषेध
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- जालना येथील आमदार अर्जुन खोतकर यांनी सोशल मीडिया व न्यूज चॅनेलसमोर हिंदू खाटीक समाजाविषयी तिरस्कार, दोष निर्माण होईल असे अपमानास्पद बेताल वक्तव्य करून हिंदू खाटीक समाजाच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. आमदार खोतकर यांनी केलेल्या निषेधार्थ नातेपुते येथील हिंदू खाटीक समाजाच्या वतीने जाहीर निषेध करून नातेपुते पोलीस ठाणे व माळशिरस तहसील कार्यालय येथे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करून हिंदू खाटीक समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी नातेपुते येथील हिंदू खाटीक समाज संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments