Hot Posts

6/recent/ticker-posts

अबॅकस मुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळते- जयसिंह मोहिते पाटील

 अबॅकस मुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळते- जयसिंह मोहिते पाटील




अकलूज (कटूसत्य वृत्त):- आय चॅम्प अबॅकस चे संस्थापक अध्यक्ष विशाल माने संचालिका स्नेहल माने यांनी घेतलेल्या स्पर्धेत यंदा ३५० विध्यार्थी सहभागी झाले होते.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अबॅकस म्हणजेच अंकाची जादू अनुभवता यावी,मनातील गणिताची भीती नष्ट व्हावी,क्षणातच गणिते सोडवता यावी हा हेतू डोळ्या समोर ठेवून ही स्पर्धा घेण्यात आली.
आय चॅम्प अबॅकस स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप मोठ्या जल्लोषात करण्यात आले.
       या कार्यक्रमाची सुरवात सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर बक्षीस वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
         या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना चालना देण्याचे काम अबॅकस करीत आहे.निश्चितच यशाच्या शिखरावर चढण्यासाठी  अबॅकस चा फायदा होणार आहे. नंतर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत मार्गदर्शन करताना सांगितले की जिद्द चिकाटी व प्रयत्नात सातत्य असल्याशिवाय यश मिळत नाही. सयाजीराजे मोहिते पाटील व स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या हस्ते आय चॅम्प अबॅकस स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेता निहारिका रणजित कोरटकर,द्वितीय क्रमांक सिद्धी रवींद्र बर्गे,तृतीय क्रमांक स्वरा विनोदकुमार म्हसवडे ,वरद किरण रनवरे,शिवतेज योगीराज चिकणे, प्रणव नवनाथ व्यवहारे,अनघा हरिभाऊ कुलकर्णी यांना ट्रॉफी देऊन सन्मानित केले.निहारिका कोरटकर  व भक्ती यलमार यानी सर्वोत्कृष्ट गुण मिळवून स्पर्धेत सायकल जिंकली.स्मार्ट वॉच विनर शमिका गोसावी,यशराज कदम, निर्भय जाधव ,यतिशवर रुपनवर हे विजेता ठरले.त्याच प्रमाणे बेस्ट फ्रॅंचॉईसी अवॉर्ड ,बेस्ट टीचर अवॉर्ड,बिग अचिवमेंट अवॉर्ड, स्टार्टअप अवॉर्ड प्रदान करण्यात आले.
        याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. शिल्पा फडे,लेखिका व कवयित्री नूरजहाँ शेख,विश्वजीत माने,संदीप जाधव,वदंना बनसोडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
           या कार्यक्रमाची प्रस्ताविक रेश्मा तांबोळी यांनी केली तर सूत्रसंचालन सुहास उरवणे यांनी केले आयोजक आय चैम्प अबॅकस प्रायव्हेट लिमिटेड चे डायरेक्टर विशाल माने यानी उपस्थितांचे आभार मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments