लंम्पी बाधीत उपचार करण्याकरिता मोकाट व बेवारस गोवंशासाठी विलगीकरणाची कक्षाची सोय
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहर हद्दीत मोकाट फिरणार्या लंम्पी बाधित मोकाट व बेवारस गोवंशासाठी सोलापूर महानगर पालिका व पशुसंवर्धन विभागांन संयुक्त विद्यमानाने विलगिकरण कक्षाची सोय करण्यात येत आहे.
पशु कल्याण अधिकारी व जिल्हाप्राणी क्लेश प्रतिबंधित समिती सदस्य केतनभाई शहा यांनी गोवंशाना सध्या लंम्पी ह्या जीवघेण्या संसर्गजन्य रोगाची लागण होत आहे त्या करिता लंम्पी बाधित गोवंशा साठी उपचार व देखभाली साठी तातडीने लस मागवाव्यात व विलगीकरण कक्षाची सोय करावी असे पत्र जिल्हाधिकारी,मुख्यकार्यकारी अधिकारी व पशुसंवर्धन उपायुक्त यांना देण्यात आले होते.
त्या पत्राची तात्काळ दखल घेऊन जिल्हा साठी दिड लाख लस्सी ह्या पशुसंवर्धन उपयुक्त यांनी मागवून घेतल्या असून, सोमपा आयुक्त डॉ सचिन ओंबसे यांची पशुसंवर्धन उपायुक्त डॉ विशाल येवले व महापालिका अधिकारी सतीश चौगुले व केतनभाई शहा यांनी कोंडवाड्या भेट घेऊन पाहणी केली सिव्हिल हॉस्पिटल समोरील कोंडवाड्यात विलगिकरण कक्ष ताबडतोब उभा करावा असा आदेश सोमपा आयुक्त यांनी काढला व सतीश चौगुले यांची नेमणूक केली व गोवंशा साठी उपचार व चारा पाणी ची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.
शहर हद्दीत कोणालाही लंम्पीबाधित गोवंश दिसल्यास त्वरित डॉ गिड्डे यांच्या खालील मोबाईलवर संपर्क साधावा 9309131647
तसेच पाळीव गोवंशाना सुद्धा हा रोग आढळल्यास त्वरित आपल्या गोठ्यात येऊन डॉक्टर उपचार करतील व मोकाट फिरणाऱ्या गोवंशाना पोटफाडी चौकातील कोंडवण्यात आणून उपचार केले जातील.
हा रोग संसर्गजन्य असल्याने ह्याचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून ही उपाय योजना करणे गरजेचे होते असे पत्रक मुंबई उच्च न्यायालय व महाराष्ट्र शासन नियुक्त ऍनिमल वेल्फेअर ऑफिसर केतनभाई शहा यांनी दिले आहे.
0 Comments