Hot Posts

6/recent/ticker-posts

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत कामती व बुद्रुकवाडी ग्रामपंचातीची विभागीय स्तर तपासणी

 संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत कामती व बुद्रुकवाडी ग्रामपंचातीची विभागीय स्तर तपासणी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत विभागीय स्तर तपासणी करण्यात आली मोहोळ तालुक्यातील कामठी खुर्द व माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी या ग्रामपंचायतीची पाहणी करण्यात आली यामध्ये पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त (विकास) श्रीमती. दिपाली देशपांडे- विभागीय आयुक्त कार्यालय पुणे , सहायक आयुक्त (विकास) रविंद्र कणसे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता प्रविण पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, सहाय्यक गटविकास अधिकारी विजयकुमार देशमुख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सहायक प्रशासन अधिकारी शैलेश सराफ, कनिष्ठ सहायक विशाल भुरकुंडे, सरपंच सविता किरण माळी, उपसरपंच दीपक काटकर,  जिल्हा प्रशिक्षण समन्वयक शंकर बंडगर, क्षमता बांधणी सल्लागार महादेव शिंदे , इंजिनियर योगेश कुंभार, विस्तार अधिकारी पंचायत नागसेन कांबळे, विस्तार अधिकारी पंचायत ठक्का, समूह समन्वयक प्रशांत शिंदे उपस्थित होके. ग्रामपंचायत अधिकारी मंजुश्री कारंडे या्नी प्रेझेंटेशन द्वारे गावात राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
प्रास्तविक सोलापूर दूध संघाचे व्हाईस चेअरमन दीपक माळी यांनी केले. कामती बुद्रुक व बुद्रुकवाडी येथील शाळेतील व अंगणवाडीस भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ग्रामपंचायती मध्ये फिरून पायी चालत पाहणी केली. शाळा स्वच्छतागृह, वैयक्तिक स्वच्छतागृह, सार्वजनिक स्वच्छतागृह, परसबागा, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, महिला बचत गटांनी केलेली विविध उपक्रम मासिक पाळी व्यवस्थापनासाठी ट ग्रामपंचायतीने राबविलेले उपक्रम व या विविध कामांची पाहणी अपर आयुक्त दिपाली देशपांडे यांनी केले. सर्व अंगणवाडी सेविका, आशा वर्कर ग्रामपंचायत कर्मचारी सर्व ग्रामपंचायत सदस्य शिक्षक शिक्षक यांचे सहकाऱ्यांनी विभागीय तपासणीची कार्यवाही पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

महिलांच्या आरोग्या साठी लक्ष द्या - अपर आयुक्त दिपाली देशपांडे

 कामती गावात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन वाटप, माझी वसुंधरा अंतर्गत राबविलेले विविध उपक्रमाचे कौतुक अपर आयुक्त दिपाली देशपांडे यांनी केले. महिलासाठी सार्वजनिक ठिकाणी सॅनिटरू नॅपकीन साठी व्हेडींग मशीन बसविण्याच्या सुचना केल्या. पाणी गुणवत्तेसाठी काळजी घेणेचे सुचना दिल्या. महिलांचे आरोग्या कडे प्राधान्याने लक्ष द्या असेही त्यांनी सांगून स्पर्धा परीक्षेसाठी गावातील युवकांना प्रोत्साहन देणे साठी अद्यावत लायब्ररी करा अशा सुचना अपर आयुक्त देशपांडे यांनी दिल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments